shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची वाहतूक होते !समस्त त्रस्त नागरीकांचा आरोप जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जाते ?

 नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या 
पथकाची शेवगावात धडक कारवाई 

शेवगाव (प्रतिनिधी ):- शेवगाव तालुक्यात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआम वाहतूक सुरू आहे. वाळूमाफियांवर कारवाई करण्यास व वाळूचोरी रोखण्यात स्थानिक महसूल प्रशासन अपयशी ठरले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष घालून वाळू माफियांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रात्रभर वाळूची वाहतूक सुरू असताना महसूल कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शेवगाव तालुक्यातील मुंगी, आखेगाव,खरडगाव, वरुर, वडुले, बोधेगाव यासह गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या गावातून दररोज  वाहनांतून बिनधास्तपणे वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. वाळूचोरीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. वाहनांतून वाळू वाहतूक केली जात असताना स्थानिक महसूल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून वाळूमाफियांना अभय देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वाळू वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरून भरधाव जात असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. शेवगाव शहर व तालुक्यात ग्रामीण भागात अनेक नवीन बांधकामे सुरू असून, वाळू माफियांकडून ठिकठिकाणी वाळूचे साठे करण्यात आले आहेत.

वाळूची टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. वाळूमाफियांचे दलाल दिवसभर महसूल कार्यालय परिसरात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. सायंकाळी सातपासून सकाळी आठपर्यंत वाळूची वाहतूक बिनधास्त सुरू आहे. वाळूचोरीस आळा घालण्यात अथवा कारवाई करण्यास स्थानिक महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील आठवडय़ात शेवगाव तालुक्यातील विविध भागात सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापे मारून कारवाई केली अवैध्य वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात काही प्रमाणात यश आले आहेत नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेवगावला येऊन अवैध वाळू वाहतूक  करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करतात मात्र शेवगावचे महसूल प्रशासनाला अवैध वाळू वाहतूक करणारे सापडत नसल्याने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा होत आहे 


वाळूची टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. वाळूमाफियांचे दलाल दिवसभर महसूल कार्यालय परिसरात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

वाळू तस्करांचा पोलिसांवर हल्ला..

शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी आपल्या पथकासह तालुक्यातील पूर्व भागातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेले असताना चक्क त्यांच्या वाहनांवर वाळू तस्करांनी जोरदार धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला यामुळे वाळूतस्करांची मोठी हिम्मत वाढली आहे.
close