shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अवसरी येथे शेतीशाळा कार्यक्रम आयोजन.

अवसरी येथे शेतीशाळा कार्यक्रम आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १७/०१/२०२३ रोजी अवसरी येथील शेतीशाळा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.  यावेळी पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास मा.तालुका कृषी अधिकारी  रूपनवर  यांनी उपस्थित महिलांना पौष्टीक तृणधान्य यांचे आहारातील महत्त्व, वेगवेगळ्या तृणधान्यांच्या पाककृती व  तालुका स्तरीय बाजरी तृणधान्य पाककृती स्पर्धा याबद्दल  मार्गदर्शन केले. मा. मंडळ कृषी अधिकारी  कोकणे  यांनी उपस्थित महिलांना महिला यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच मा. मंडळ कृषी अधिकारी  सूर्यवंशी  यांनी वेगवेगळ्या तृणधान्याचे पौष्टिक मूल्य व तसेच वेगवेगळ्या तृणधान्यांच्या पाककृती आणि प्रधानमंत्री मंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग याविषयी मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक अनुपमा देवकर यांनी बाजरी पासून वेगवेगळ्या पाककृती बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले . उपस्थित महिलांनी तृणधान्यापासून बनवलेल्या पारंपरिक पाककृतींबद्दल माहितीची देवाण घेवाण केली.
close