रेडके कुटुंबाकडून सुवर्णपदक विजेता पै.अनिल कचरेचा सन्मान..
इंदापूर प्रतिनिधी: कोथरूड पुणे येथे ६५ वे महाराष्ट्र केसरी अधिवेशन २०२२-२३ दि.१० ते १४ जानेवारी २०२३ रोजी वजन गट ७० किलो माती विभागात या स्पर्धेमध्ये अनिल कचरे यांनी एकूण पाच कुस्त्या जिंकत सुवर्णपदक पटकावले.या मध्ये आकाश कापडे, सुरज गवळी, देवानंद पवार तसेच उपांत्य फेरीत गडचिरोलीच्या आकाश चव्हाण वर विजय मिळवला.अंतिम लढतीत गतवर्षीचा ७० किलो वजन गटातील सुवर्णपदक विजेता निखिल कदम याच्यावर ९-३ अशा फरकाने विजय मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले.
त्याच्या या विजयाची पडस्थळ गावचे मा.सरपंच व जुने मल्ल हरिआण्णा रेडके यांनी अनिल कचरे चा सन्मान करून रोख बक्षीस दिले.
यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, मधुकर कचरे, लक्ष्मण देवकाते, नारायण रेडके उपस्थित होते.
शिरसोडी गावचा मल्ल अनिल कचरे याने यापूर्वीही ज्युनिअर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत २ वेळा प्रथम क्रमांक मिळविला आहे. आजोबा गणपत कचरे व वडील कोंडीराम कचरे यांच्याकडून हा कुस्तीचा वारसा अनिलला मिळाला आहे.सध्या तो इंदापूर येथे कै. पै. रंगनाथ मारकड कुस्ती संकुल येथे NIS कुस्ती कोच मारुती मारकड व एन आय एस कुस्ती कोच सागर मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
चौकट:
**तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पै.अनिल कचरे यांचा सन्मान* .*
तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात व नानासाहेब खरात यांच्यावतीने पै.अनिल कचरे यांचा सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळालेल्या कित्येक खेळाडूंना या अगोदर तेजपृथ्वी ग्रुप कडून सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली आहे. योगाक्षेत्रात जागतिक विक्रम केलेली प्रतीक्षा पाटील, गायिका राधा खूडे, झी टॉकीज फेम गायक सोहेल मुलांनी, युक्रेन देशातून परत आलेला वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी शुभम पाडुळे यांचा तसेच एमपीएससी, यूपीएससी क्षेत्रामध्ये इंदापूर तालुक्यातील यश मिळवलेल्या अनेकांना तेजपृथ्वी ग्रुप कडून सन्मानित करण्यात आले आहे.

