प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : १७ / चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोबतच महाविद्यालया तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक उपक्रम आसपासच्या गावांमध्ये घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चास येथे १४ जानेवारी २०२३ रोजी “बेटी बचाव बेटी पढाव” हे अभियान राबविण्यात आले.
डॉ. प्रदीप एम. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कॉलेजमधील विध्यार्थी कार्यक्रमाचे डीन प्रा. स्नेहिल गायकवाड, प्रा. बाबासाहेब इंगळे, प्रा. निलेश आठवले, संगणक विभागातील प्रा. सचिन भोंडवे, एमबीए विभागातील प्रा. गजानन नाईक व विध्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाच्या वेळी चास गावचे सरपंच मा. ॲडव्होकेट राजेंद्र गावखरे, उपसरपंच मा. युवराज कारले, चेअरमन मा. भाऊ काळे, व्हाईस चेअरमन मा. सुभाष गवळी उपस्थित होते. याप्रसंगी व्हाईस चेअरमन मा. सुभाष गवळी यांनी कॉलेजमधील प्राध्यापकांचे व विध्यार्थीनीचे आभार मानले.
महाविद्यालयाचे डायरेक्टर व प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले की, संकुचित विचारसरणीचे लोक मुली आणि मुलामध्ये भेदभाव करतात . त्यांना वाटते कि मुले आयुष्यभर आपली सेवा करतील आणि मुली ह्या परकी संपत्ती आहेत ,त्यांना शिकवून काय फायदा होणार नाही . परंतु आजच्या युगात बघितले तर प्रत्येक क्षेत्रात मुली ह्या बाजी मारत आहेत . त्याच आज पालकांना चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत . त्यामुळे आपण मुले व मुली मध्ये फरक न करता दोघांनाही चांगल्या शिक्षण, संस्कार दिले पाहिजेत.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ माणिक आडसूळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदीप एम पाटील, उप प्राचार्य श्री किशोर जाधव, संगणक विभाग प्रमुख डॉ.हेमंत जाधव, एम.बी.ए विभाग प्रमुख डॉ.विश्वजित कांबळे , इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ.दिनेश अडोकर, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. गणेश शिरसाट, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. संकेत शिंदे, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. पूजा साठे,डॉ.धन्यकुमार जैन यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

