shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आडसूळ टेक्निकल कॅम्पसमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : १७ /  चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोबतच महाविद्यालया तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक उपक्रम घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आडसूळ टेक्निकल कॅम्पसमध्ये दि. १२ जानेवारी रोजी  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी  करण्यात  आली.  

या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे डायरेक्टर व प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले कि, स्वामी विवेकानंद हे एक महान विचारवंत होते ज्यांनी जगभरात भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीला एक नवीन ओळख दिली.  हा दिवस देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि त्यांचे महान विचार आपणा सर्वांसाठी फारच प्रेरणादायक  आहेत. तसेच राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेचे बीज मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरले. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले. जिजाऊ खरोखर आदर्श माता आहेत. आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं. स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ माणिक आडसूळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  प्रदीप एम पाटील, उप प्राचार्य श्री किशोर जाधव, संगणक विभाग प्रमुख डॉ.हेमंत जाधव, एम.बी.ए विभाग प्रमुख डॉ.विश्वजित कांबळे , इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ.दिनेश अडोकर,  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. संकेत शिंदे, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. पूजा साठे, डॉ.धन्यकुमार जैन हे उपस्थित होते .
close