shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन.ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.

एन.ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी: एन.ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथे राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयातील एकूण १३ विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे हे होते. पर्यवेक्षक मधुकर  खरात, प्रमोद  चव्हाण, सोमनाथ  चौधर, आजिनाथ  मालगुडे, आशा  पर्वते, स्वप्नाली  पाटील व इतर सहकारी शिक्षक बंधूंनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन केले.
 आजच्या  युवक, युतींनी  जिजाऊ व  स्वामी विवेकानंदाच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे असे मत स्वप्नाली  पाटील यांनी व्यक्त केले .तर आदर्श माता आदर्श नेतृत्व कसे असावे हे आपण जिजाऊ साहेबांकडून व स्वामी विवेकानंदाकडून शिकले पाहिजे असे मत सोमनाथ  चौधर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले . तर रफिक बापू आतार यांनीही आपले विचार व्यक्त केले. व सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
आपल्या विद्यालयातील सर्वच विद्यार्थी आदर्शांचा उत्तम नमुना आहेत नक्कीच  जिजाऊंची व स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे आचरण करतील याचा मला सार्थ विश्वास आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत रनवरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागांनी केले तर सूत्रसंचालन आजिनाथ मालगुडे यांनी केले.
close