shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पळसदेव येथील पवार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने ऊस तोडणी कामगारांना ब्लॅंकेट वाटप.

 
पळसदेव येथील पवार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने ऊस तोडणी कामगारांना ब्लॅंकेट वाटप.
  
       इंदापूर प्रतिनिधी:  आगामी काळात ऊस तोडणी कामगारांची मुलं शाळा बाह्य राहणार नाही यासाठी  पवार चॅरिटेबल ट्रस्ट पळसदेव च्या  वतीने ऊस तोडणी कामगारांमध्ये मुलांच्या शिक्षणा बाबत जनजागृती करून  या मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे  व या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक शालेय साहित्य संस्थेच्या वतीने मोफत देण्यात येईल असे मत  राहुल बनसुडे यांनी मकर संक्रातीच्या निमित्ताने ऊस तोडणी कामगारांना मोफत ब्लॅंकेट वाटप  व मुलांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या वेळी बोलताना व्यक्त केले . 
     पुणे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने ऊस तोडणी कामगार दर वर्षी मोठ्या प्रमाणात या भागात दाखल होतात . हे ऊस तोडणी कामगार महाराष्टातून विविध जिल्ह्यातून तसेच मध्य प्रदेश ,कर्नाटक , आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून येतात .सुमारे पाच ते सहा महिने उसाचा गाळप हंगाम असतो या दरम्यान संपूर्ण कुटुंबासह आलेल्या कामगाराच्या मुलांचा शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे यासाठी शासन यंत्रणे बरोबर सामाजिक संस्थांनी देखील यामध्ये काम करण्याची आवश्यकता  आहे . 
      ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचा शिक्षण व आरोग्याची समस्यां विचारात घेता पवार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कामगारांमध्ये जजागृती निर्माण करून आवश्यक शालेय साहित्य देऊन या मुलांना मूळ प्रवाहात आण्याच काम सुरु आहे . या वेळी  राहुल बनसुडे  , सुजित मोरे ,अजित शिंदे , मुख्याध्यपक संतोष भोंग ,सनील शिंदे , संस्थेचे  अध्यक्ष रामदास पवार सह नागरिक उपस्थित होते .  


close