shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गाडी निट चालवा धनी !घरी वाट पाहतयं कोणी !!

रस्त्यावर वाहन चालविताना कटाक्षाने वाहतुकीचे नियम पाळावे,अती वेगाने तथा कोणतेही नशा पाणी करुन वाहने चालवू नये,सुरक्षितपणे वाहन चालविल्यास आपण आपल्यासह इतरांचाही बचाव करु शकतो, आपण सुरक्षित तर इतरही सुरक्षित,आपला प्रवास सुखाचा झाला तर आपला परिवार देखील सुखात असेल आणि आपणच जर नशापाणी करत अती वेगाने आपली वाहने चालविली तर संभव्य अपघाताची शक्यता ही नाकारता येवूच शकत नाही.

ज्यामुळे आपण दुःखात जाणार, असा क्षणीक वाहन वेगाच्या आनंदाचा शेवट जर अपघातामुळे दुःखात होणार असेलतर ते क्षणीक सुख शेवटी काय कामाचे ? ज्यामुळे आपल्यासह आपल्या परिवारास दुःख भोगणे भाग पडते,मात्र त्यात त्यांचा दोष तो काय ?,याकरीता रस्त्यावर वाहन चालविताना लक्षपूर्वक आपली वाहने चालविली तर आपण स्वतः चा बचाव तर हमखास करणारच शिवाय जे घरी आपली अतुरतेने वाट पाहणारे आपले कुटुंबीय असतात यांना देखील आपण सदैव सुखात ठेवू शकतो याचा विचार करुनच वाहने चालविली गेल्यास मोठ्या प्रमाणावर आपण वाढत्या अपघातांवर आळा घालू शकतो.

आपला शुभचिंतक
शौकतभाई शेख
समता फाऊंडेशन, श्रीरामपूर
दि.२४ जाने.२०२३
close