शौकतभाई शेख :-
श्रीरामपूर - खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेनेचेवतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील श्रीरामपूर नगर परिषद कार्यालयासमोर वंदनिय हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी श्रीरामपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड,ज्येष्ठ पत्रकार नागेशभाई सावंत यांच्या हस्ते हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व पत्रकार रवि भागवत, प्रदिप आहेर,स्वामीराज कुलथे, विठ्ठल गोरणे यांनी पुष्पे वाहीले.
या कार्यक्रमास बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्ष सुधीर वायखिंडे, जिल्हाउपप्रमुख राजेश तांबे, तालुका प्रमुख बापुसाहेब शेरकर, शहर संघटक राजेंद्र भोसले, युवा सेना जिल्हाध्यक्ष शुभम वाघ,शहरप्रमुख विशाल शिरसाठ,युवा सेना उपजिल्हाध्यक्ष माधव टिपरे. कार्याध्यक्ष दत्तात्रय करडे, उपशहराध्यक्ष राजेश वाव्हळ, अकिल पठाण,सुभाष लबडे,अविनाश शिरसाठ, अभिषेक टिपरे, विशाल रहीले,विशाल यमे, पिपल्स पी.आर.पी. तालुकाध्यक्ष संतोष मोकळ.संदिप दातीर,महिला आघाडी तालुकाप्रमुख पुनमताई जाधव,शिवनाथ फोफसे,राहुल दातीर,लक्ष्मण पाचपिंड,किशोर जाधव,बबलू चौधरी,महेश मोदी,किरण वेताळ, किरण जाधव,दिगंबर आमले,मीननाथ थोरात,जालिंदर मुठे,सचिन कटानवरे,निलेश बोर्डे, प्रशांत भांड,अनुप भांड,तेजस थोरे, सागर भांड,आदि मान्यवर उपस्थित होते.

