इंदापूर ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
ज्येष्ठ नागरिक संघाचे नूतन संचालक मंडळ निवडीचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर.
इंदापूर प्रतिनिधी:ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सुरू झाली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या सभेचे प्रस्ताविक बाबासाहेब घाडगे सर जेष्ठ मार्गदर्शक यांनी केली. ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव हनुमंत शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचा वार्षिक ताळेबंद मांडला तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक संघाचे नूतन संचालक मंडळ निवडीचा प्रस्ताव पुढे आला तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हे संचालक मंडळ सन २०२३ ते२०२५ या तीन वर्षासाठी निवडले गेले. हे संचालक मंडळ ज्येष्ठ नागरिक संघाचे काम पाहणार आहे.
यानंतर संघाचे मावळत्या अध्यक्ष नंदकुमार गुजर यांचे भाषण झाले त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक उपक्रम घेतले. आरोग्य, सहल, भारुड असे भरीव काम झाले. सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याचा लाभ झाला त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिक अतिशय आनंदी आहे. आभार प्रदर्शनाचे काम महाजन सुभाष सर यांनी केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहकार्य केले उपाध्यक्ष पांडुरंग जगताप प्रमोद भंडारी,भानुदास पवार , खबाले महाराज , काशिनाथ जगताप, दत्तात्रेय चांदणे ,बाळासाहेब पाटील पाणबुडे गुरुजी ,महादेव चव्हाण सर ,भारत बोराटे सर या सर्वांनी सर्वसाधारण सभा पार पडण्यास मदत केली.
खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा झाली. सभेनंतर भोजन व्यवस्था सर्व सभासदांसाठी केली होती.

