shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर मध्ये पतंजली ट्रस्टचा स्थापना दिवस साजरा

इंदापूर मध्ये पतंजली ट्रस्टचा स्थापना दिवस साजरा
 इंदापूर प्रतिनिधी: योग आयुर्वेद स्वदेशी वैदिक शिक्षण निष्काम सेवा व साधनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या पतंजली योगपीठ ट्रस्ट व भारत स्वाभिमान्यास ला ५ जानेवारीला गौरवशाली २८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पतंजली योग परिवार इंदापूर यांचे वतीने स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी योगसाधने सोबतच ध्वजारोहन,यज्ञ,सत्संग स्वदेशी संकल्प  करण्यात आला.
 कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर  भरणे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे ,बालरोग तज्ञ डॉक्टर एल एस कदम ,एडवोकेट जालिंदर बसळे ,मुख्याध्यापक दत्तात्रेय ठोंबरे ,भारती भंडारी ,पतंजलि परीवाराचे प्रमुख जयकुमार शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.
 यावेळी माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी योग सेवेसाठी दिलेल्या साऊंड सिस्टिम व इतर साहित्यांचा लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आला.
   प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर एल एस कदम यांनी ऍलोपॅथीचे दुष्परिणाम लहान मुलांचे आरोग्य आणि व्यायाम खेळ योगासने प्राणायाम या विषयाचे महत्त्व आपल्या व्याख्यानातून योग साधकांना समजावून सांगितले युवा भारतचे प्रशांत गिड्डे यांनी पतंजली योगपीठच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत २८ वर्षांमध्ये योग समितीने केलेल्या विविध सामाजिक सेवेबद्दल आणि ट्रस्टच्या माध्यमातून चाललेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. सचिन पवार, अण्णासाहेब चोपडे ,रामेश्वर जी साठे यांनी कार्यक्रमादरम्यान योगासने प्राणायाम ची प्रात्यक्षिके करून घेतली.

 भारत स्वाभिमान राज्य कार्यालयाने नवीन कार्यकारणीची नियुक्ती केल्याबद्दल सर्वनवनियुक्त पदाधिकार्‍यांचा  सन्मान करण्यात आला. सन्मान भारत स्वाभिमान्यांसचे प्रभारी जयकुमार शिंदे,  बिभिषन  खबाले, पतंजली योग समितीचे प्रभारी मल्हारी घाडगे , रविंद्र परबत ,गोकुळ हराळे, युवा भारतचे प्रभारी सचिन पवार, रामेश्वरजी साठे, अण्णासाहेब चोपडे ,सोशल मीडिया प्रभारी  शरद झोळ, भालचंद्र भोसले, किसान सेवा समितीचे प्रभारी चंद्रकांत देवकर ,काशिनाथ पारेकर, देवराव मते, महिलायोग समितीच्या प्रभारी सायरा आतार, मेघा भंडारी ,जयश्री खबाले यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सामाजीक कार्यकर्ते हमीदभाई आतार, किसन पवार, राजेंद्र चव्हाण, शंकर काशीद, विकास खिलारे,बाजीराव शिंदे, समाधान भोरकडे ,उदय शिंदे ,महादेव गव्हाणे, सुनील कांबळे, सुनील देवळालीकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद झोळ आभार प्रदर्शन रवींद्र परबत यांनी केले .
कार्यक्रमाच्या शेवटी शिवसेना शहरप्रमुख महादेव सोमवंशी मेजर यांनी पौष्टिक अल्पोपहार दिला
close