shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील अवसरी गावाच्या परीसरातील ८९ ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी .

कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील अवसरी गावाच्या परीसरातील ८९ ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी .

शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर फिरता दवाखाना मजुरांच्या आरोग्यासाठी वरदान.
इंदापूर प्रतिनिधी: शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर फिरता दवाखाना  दिनांक ५ जानेवारी२०२३ रोजी कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील अवसरी गावाच्या परीसरातील ८९ ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या तपासणी वेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिंदे शांतिलाल दत्तात्रय, दत्तात्रय मगर ग्रामपंचायत सदस्य अवसरी, माणिकराव राहीगुडे ,विठ्ठल राहीगुडे, गणेश शिंदे ,रणजीत शिंदे, अंगद पेंडवळे ,विठ्ठल चव्हाण, विठ्ठल चौगुले, अतुल मोरे, बाळू आवटे, संजय आवटे ,सचिन जगताप, सतीश जगताप ,गणेश मोरे, ननवरे संजय, ऋषिकेश शिंदे ,राजेंद्र चव्हाण, पांडुरंग शिंदे, शिंदे दत्तात्रेय, अवसरी गावातील  कर्मयोगी चे सर्व सभासद उपस्थित होते. 
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट चे खजिनदार  तुषार रंजनकर  , सौ रंजनकर मॅडम, शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे एडमिनर  दीपक जगताप , रणजीत वाघमारे , या सर्वांनी ऊसतोड मजुरांना त्यांच्या मुलांना खाऊ वाटप केला. 
तुषार रंजनकर  यांनी ऊसतोड मजुरांची आपुलकीने  विचारणा केली. तुमची डॉक्टरांनी केलेली तपासणी, तुम्हाला दिलेली औषधे ही सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत दिली जाते. ती सेवा कशी काय आहे असे प्रश्न ऊसतोड मजुरांना विचारले त्याच्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. धन्य तुमची सेवा धन्य ताई आणि तुम्ही आहात. ही सेवा आतापर्यंत कोणीही आम्हाला दिली नव्हती ती तुम्ही पुरवली त्याबद्दल आम्ही धन्य झालो.
कर्मयोगी चे कर्मचारी वर्ग विभाग इंदापूर  या विभागाचे प्रमुख एम.बी.मुलाणी,एम.व्ही.देवकर,आर.एस. चव्हाण यांनी सर्व टोळ्यांची आरोग्य तपासणी करून घेतली. केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण , श्री संजय शेलार , केंद्राच्या डॉक्टर कुंभार सारंगी निलेश, नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, वॉर्ड बॉय अकतर शेख या सर्वांच्या मदतीने आरोग्य तपासणी पूर्ण झाली.
close