प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
अवैद्य धंद्या विरुद्ध कठोर कारवाई करणारे सिंघम आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे प्रशिक्षण संपताच केज येथे रुजू झाले असून ते रुजू होताच त्यांच्या पथकाने चिंचोली माळी येथील एका धाब्यावर धाड टाकली. ढाबा चालकासह मुद्देमाल ताब्यात घेतला.
या बाबतची माहिती अशी की, काही दिवसा पूर्वी अवैद्य धंद्यावाल्यांच्या उरात धडकी भरविणारे आयपीएस पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे प्रशिक्षणासाठी राज्या बाहेर गेले होते. प्रशिक्षण कालावधी संपताच ते केज येथे रुजू झाले असून रुजू होताच त्यांनी अवैद्य धंद्यावर कारवाई करून धडाकेबाज एन्ट्री केली आहे. पंकज कुमावत यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे, पोलीस जमादार बालाजी दराडे, पोलीस जमादार बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक राजू वंजारे महिला पोलीस नाईक आशा चौरे यांच्या पथकाने गुरुवार दि. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५:०० च्या दरम्यान केज ते चिंचोली माळी मार्गावर चिंचोली माळी शिवारातील जगदंबा धाब्यावर धाड टाकली. त्या धाडीत ढाबा चालक दीपक गायकवाड हा देशी व विदेशी दारु जवळ बाळगून चोरटी विक्री करीत असल्याची आढळून आले. पोलिसांनी दिपक गायकवाड यांच्यासह ५ हजार ५९५ रु ची देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
पोलीस जमादार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून पुन्हा पंकज कुमावत यांच्या एंट्रीने गुटका, मटका आणि चोरटी दारु वाहतूक व विक्री या सारख्या अवैद्य धंद्यावले धास्तावले आहेत.

