shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आर.पी. आय.जिल्हा प्रमुख सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या नेतृत्वाखाली उद्या सकाळी 11 वाजता बेमुदत उपोषण...!

आर.पी. आय.जिल्हा प्रमुख सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या नेतृत्वाखाली उद्या सकाळी 11 वाजता बेमुदत उपोषण

शिर्डी :-शिर्डी येथील पिंपळवाडी येथे वडार समाजातील कुटुंब प्रमुख अर्जुन गट्टू जाधव यांना मारहाण करून शेतातील दूरवर विहिरीत फेकुन दिले अशा प्रकारे त्यांचा खून करण्यात आला.

 खुणातील एकूण 4आरोपी असताना केवळ 1 आरोपी पकडून त्यालाही जामीन करून सोडण्यात आले. इतर आरोपींना  कोणालाही अटक केले नाही, म्हणुन आर.पी.आय.वतीने वडार समाजातील महिला तसेच पुरूषांना सोबत घेऊन उद्या दिनांक 27/02/2023 रोजी सकाळी 11वाजता शिर्डी पोलीस स्टेशन शिर्डी या ठिकाणी आर.पी.आय.जिल्हा प्रमुख सुरेंद्र भाऊ थोरात तसेच राहता तालुका युवक आर.पी.आय प्रमुख करण कोळगे वडार संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष गंगा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.तरी सर्वांनी या जाधव कुटूंबियांना योग्य तो न्याय मिळावा़... यासाठी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे.

ठिकाण:-शिर्डी पोलीस स्टेशन-शिर्डी.
close