shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्त्री जन्माचे अविस्मरणीय स्वागत ; धोंगडे परिवाराने केला स्त्री जन्म उत्सव साजरा


मुलगी ही लक्ष्मीचे रूप - अक्षय धोंगडे

प्रतिनिधी : आसावरी वायकर

पुणे : 5 /  नवजात शिशु रिया हीचा जन्म 23 नोव्हेंबर 2022 या शुभ दिनी झाला . तिच्या जन्माचे म्हणजेच स्त्री जन्माचे स्वागत धोंगडे परिवाराने 4 फेब्रुवारीला सूस, पुणे येथे संध्याकाळी 6 वाजता सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत केले . रियाला घरी आणताना तिचे स्वागत  बँड बाजा लावून करण्यात आले. सर्वांनी आनंदाने नाचून आपला आनंद व्यक्त केला .या शुभ प्रसंगी सर्वांनी     मिष्ठान्नाचा आस्वाद घेतला .


रिया चे वडिल अक्षय धोंगडे आनंद व्यक्त करताना म्हणाले की, " मुलगी ही एक लक्ष्मीच असते . लक्ष्मीचे रूप असते .स्त्री जन्माचे सर्वांनीच स्वागत करा. तिला भरपूर प्रेम     दया ". तसेच रियाची आई पायल धोंगडे यांनी सांगितले की , " रियाच्या जन्माने माझे मातृत्व पूर्ण झाले आहे .मी खूप आनंदात  आहे.रियाचे आजी -आजोबा खूप आनंदात आहेत ." 

रियाचे आजोबाही आपले मनोगत व्यक्त करताना  म्हणाले की, "आमच्या घरी लक्ष्मी आलेली आहे . मूलगी शिकली की कुटुंबाचीही प्रगती होते . तिचे आनंदाने स्वागत करा " . यावेळी ' बाळाच्या पावलांचे ठसे ' चिरंतर आठवण रहावी म्हणून घेण्यात आल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले .

 या कार्यक्रमाला अरविंद येणगुरे, संजय शहा , सुशिला येणगुरे , उषा धोंगडे , सुखदा शहा, लक्ष्मीकांत भालेराव , पदमा भालेराव, अश्विनी येणगुरे, अपर्णा गुमते ,  आसावरी वायकर , मेघा जैन, शितल जैन , शुभम शहा, रुचिता शहा , संवेद वायकर, शुभ्रा गुमते, आयुष जैन , पियुष जैन , अभिजीत भालेराव आदि कुटुंबातील सन्माननीय सदस्य उपस्थित होते .
close