*दर्जेदार शैक्षणाबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात कुरवली विद्यालयाचे योगदान उल्लेखनीय-हर्षवर्धन पाटील*
इंदापूर प्रतिनिधी: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मा. सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती विलास माने होते.यावेळी प्राथ.माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्र बरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात कुरवली विद्यालयाचे योगदान महत्त्वाचे आहे.कला,क्रीडा,विज्ञान नाट्य या क्षेत्रात या विद्यालयाने तालुक्यामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.शिस्त,गुणवत्ता व दर्जेदारशिक्षण यामुळे पालकांचा विश्वास या विद्यालयाने संपादन केलेला असून सत्तावीस विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या विद्यालयात आज मितिला अकराशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. याची सारे श्रेय प्राचार्य घोरपडे सर व सर्व शिक्षक टीमला दिले जाते.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी कुरवली व परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली होती.सुमारे चार ते पाच हजार दर्शक यावेळेस कार्यक्रम पाहण्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप पवार व बाळासाहेब मोरे यांनी केले.*
यावेळी सचिव किरण पाटील, निरा भिमा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक विलास वाघमोडे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक लालासाहेब सपकळ,अँड विजय पांढरे ,संग्रामसिंह निंबाळकर, तानाजीराव निंबाळकर,पै.नितीन माने,पवारवाडी चे सरपंच वाबळे,श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक स्वप्नील घोगरे ,प्रसाद पाटील, संजय घोगरे, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री साळुंखे ,भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार, पत्रकार राजकुमार थोरात, बाळासाहेब कवळे उपस्थित होते.*

