shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेडणीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

रेडणीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
इंदापूर प्रतिनिधी: शिवज्योत मित्र मंडळ यांच्या वतीने दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवचरित्र व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रेडणी येथे आयोजित करण्यात आले होते.
 यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, नीरा भीमा कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, सहकार महर्षीचे संचालक महादेव घाडगे,  गावच्या सरपंच सौ. हिराबाई खाडे, उपसरपंच प्रफुल्ल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार संपन्न झाला.
 याप्रसंगी  तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात, राज्यपाल पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित जनसमुदायास आप्पासाहेब जगदाळे यांनी संबोधित करताना म्हटले की, महाराष्ट्राचे शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील हे आज उपस्थित असून ते शिवचरित्राबद्दल आपणास मार्गदर्शन करणार आहेत. शिवजयंती व इतर जयंती साजरा करताना सगळ्यांनी एकत्र येऊन करावी परंतु या जयंती साजरा करताना सर्वजण एकत्र येत नाहीत. सर्वांनी एकत्र येत जयंती साजरी करा असा प्रस्ताव मागील वर्षी सर्वांसमोर मांडला होता. या काळात गावांनी एकोपा करावा. पुढील काळात आपण कराल असे मत व्यक्त केले व शिवजयंती निमित्त  सर्वांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी या शिवजयंती सोहळ्यास भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ५१ हजार रुपये दिले असल्याचे सूत्रसंचालक यांनी यावेळी घोषित केले.
 यानंतर प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या भाषाशैलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर उपस्थित जन समुदायास संबोधित केलेते म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराज  जनतेचा सर्वांगीण विचार करून आपले स्वराज्य  चालवत होते. त्यांनी आपल्या या राज्यात राज्यासाठी योगदान देणाऱ्या सैनिकांच्या घरातील व्यक्तींसाठी कोणकोणत्या सुविधा त्याबद्दल माहिती सांगित. आपलं सैन्य कमी असताना बलाढ्य संख्येने असणारे मुघल सैन्याला शह कसा याबद्दल सविस्तर सांगितलं. इत्यादी अनेक पैलू सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नवतरुणांपुढे मांडला. यावेळी उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन शांतपणे ऐकत असल्याचे निदर्शनास आले. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील व तालुक्यातील अनेक युवा तरुणांनी हजेरी लावली होती. संध्याकाळी ढोल ताशांच्या वाद्याच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भाऊसाहेब काळकुटे यांनी केले तर सूत्रसंचालन अमर निलाखे यांनी केले
कार्यक्रमाचे नियोजन भाजप युवा नेते अमरदीप काळकुटे व गावातील ग्रामस्थ यांनी केले.
close