साने गुरूजी आरोग्य मंदीर सांताक्रुझ शाळेत रंगणार शिक्षक सत्कार सोहळा
कु.श्रृती रसाळ- मुंबई
मुंबई - माणूस कितीही मोठा झाला तरी मनात शाळेच्या, शिक्षकांच्या आठवणींचा हळवा कोपरा हा असतोच,अनेक थोर कलाकार, साहित्यिक ,पत्रकार घडवणारी मुंबई नगरीतील सांताक्रुज़ पश्चिम येथे वसलेली साने गुरूजी आरोग्य मंदीर शाळा. नलुताई बापट,साहित्यिक वसंत बापट यांच्या कष्टांनी साकार झालेली ही शिक्षण व कला क्रिडा नगरी. फक्त शालेय शिक्षण नव्हे तर कला क्रिडा असं सर्वांगीण विकास करणारी ही समृद्ध अशी शाळा.(साने गुरूजी विद्या मंदिर, सांताक्रूज़ प. माजी विद्यार्थी संघटना ) गेली १० वर्षापासून शाळा- संस्था आणि विद्यार्थ्यांकरीता अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सहायता निधी या क्षेत्रात कार्य करीत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गेली १० वर्षे (२ वर्षापासून कोरोनामुळे खोळंबलेला)" शिक्षक कृतज्ञता दिनाचा" कार्यक्रम शाळेच्या सभागृहात आयोजित करते.
या वर्षी हा कार्यक्रम शनिवार दि. ११ फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे.या कार्यक्रमद्वारे निवृत्त शिक्षिका ज्या या शाळेच्या फक्त शिक्षिकाच नसून विद्यार्थीनी सुद्धा होत्या अश्या विद्या म्हात्रे बाई ( प्राथमिक विभाग )
आणि मनीषा जोशी बाई ( माध्यमिक विभाग )
यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
मंत्रमुग्ध अश्या वादनांसहित स्वागत गीत, शिक्षकांप्रती आदर,कृतज्ञता व्यक्त करणारी गीते व अध्यक्षीय भाषण तसेच सत्कार मूर्तींचे भाषण होणार आहेत. माजी विद्यार्थांना शाळेप्रती,आपल्या शिक्षकांप्रती सदर कार्यक्रमात भावना व्यक्त होण्याची संधी मिळते व धावत्या व्यस्त अश्या जीवनात शाळेच्या आठवणींना उजाळा देता येतो हा या कार्यक्रमाचा स्थायी भाव आहॆ .
एखाद्या सणाप्रमाणे माजी विद्यार्थी या सोहळ्याची वाट पाहत असतात.
मिलिंद जोगळेकर आणि दीपक नानचे यांनी शाळेच्या सर्व माजी विद्यार्थांना कार्यक्रमास येण्याचे आवाहन केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क व्हावा याकरिता 99694 27134 हा मोबाईल क्रमांकही देण्यात आलेला आहे.
वार्तांकन: कु.श्रृती रसाळ - मुंबई
संकलन: शौकतभाई शेख - श्रीरामपूर

