shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जि.प.केंद्रशाळा देशशिरवाडे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..!

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 
जि.प.केंद्रशाळा देशशिरवाडे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण शाळेतील मुख्याध्यापिका संगिता रायते यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद केंद्र शाळा देशशिरवाडे येथील इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना थंंडीची लाट पाहता बालगोपालांना मायेची ऊब मिळावी म्हणून येथील रहिवासी 
असलेले व सध्या पुणे स्थायिक झालेले श्री.अशोक सोनवणे व त्यांचे सुपुत्र चेतन सोनवणे व सचिन सोनवणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वखर्चाने चांगल्याप्रतिचे स्वेटर 
प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.शाळेतील100 मुलां-मुलींना वाटप केले.

सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड डान्स, नाटिका,उद्भोदात्मक ,देशभक्तिपर गीत सादर केले. या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, जेष्ठ नागरिक, अंगणवाडी कार्यकर्ते, मदतनीस, ग्रामसेवक, माध्यमिक विद्यालय येथील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
close