न्यू भैरवनाथ माध्यमिक विद्यालय काझड येथे विद्यार्थ्यांमध्ये स्नेहसंमेलनात आमदार दत्तात्रय भरणे यांनी सहभागी होत आनंद केला द्विगुणित
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील भैरवनाथ विद्या प्रतिष्ठान काझडचे न्यू भैरवनाथ माध्यमिक विद्यालय काझड येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम करून उपस्थित सर्वांना मंत्रमुक्त केले. याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आमदार दत्तात्रय भरणे सहभागी होत त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यास विद्यार्थ्यांनीही साथ दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे बोलताना म्हणाले की .शालेय जीवनातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि आवडीचा प्रसंग म्हणजे क्रीडा दिवस आणि वार्षिक स्नेहसंमेलन. क्रीडा दिवस संपल्यानंतर स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळा करत असते त्याच्यात मुख्यतः सर्व विद्यार्थी विविध गुणदर्शन दाखवत आपली कला दर्शनाचा उत्तम प्रयत्न करताना आपण पाहत असतो अशा पद्धतीने मत त्यांनी व्यक्त केले.

