बेलवाडी येथे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ६० किलो वजन गटातील राज्यस्तरीय सामन्यांचे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन.
शिवजयंती उत्सव २०२३ व दीपक अर्जुनराव देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त केले कबड्डी स्पर्धेचे आयोजन.
इंदापूर: बेलवाडी ता. इंदापूर जि. पुणे येथील कै. श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय येथे मंगळवार दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ६० किलो वजन गटातील राज्यस्तरीय कबड्डी एक दिवशीय स्पर्धेचे आयोजन शिवजयंती उत्सव २०२३ व नेचर डिलाईट डेअरी संचालक दीपक अर्जुनराव देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून नेचर डिलाईट डेअरीचे अध्यक्ष अर्जुनराव हरिभाऊ देसाई , श्री छत्रपती कारखाना मा. व्हाईस चेअरमन कांतीलाल जामदार, श्री छत्रपती कारखाना संचालक सर्जेराव जामदार, मा सरपंच यशवंत जामदार, लक्ष्मी क्लास सेंटरचे अंकुश जामदार, राष्ट्रवादी यु. काँग्रेसचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, मा. सरपंच माणिक जामदार, उपसरपंच नामदेव इथापे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना संजय काळे, महाराष्ट्र राज्य कबड्डी कोच अनिल सातव, महाराष्ट्र राज्य कबड्डी कोच ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून प्रोफेशनल कबड्डी खेळाडू सिद्धार्थ देसाई, शंकर गदई, असलम इनामदार, किरण मगर आहेत. भालचंद्र संपतराव निंबाळकर, पवन केशव जामदार, ओमकार परशुराम जामदार यांच्या सहकार्यातून स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक ,चतुर्थ क्रमांक ,बेस्ट रेडर, बेस्ट डिफेंडर ,बेस्ट ऑल राऊंडर ,सर्व बक्षीसासोबत ट्रॉफी अशा प्रकारचे भव्य दिव्य बक्षीस हे देण्यात येणार आहेत. या कबड्डी स्पर्धेच्या संपर्कासाठी संपर्क प्रमुख म्हणून बेलवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक भालचंद्र संपतराव निंबाळकर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक बेलवाडी शाखा पवन केशव जामदार, माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी इंदापूर ओंकार परशुराम जामदार हे असून निमंत्रक म्हणून जय श्रीराम प्रतिष्ठान, श्री छत्रपती कबड्डी संघ, जय महाराष्ट्र प्रतिष्ठान, योद्धा ग्रुप, डी एस ग्रुप, वक्रतुंड ग्रुप, झेड.पी. ग्रुप ,शिवगर्जना मित्र मंडळ, स्वराज प्रतिष्ठान बेलवाडी हे आहेत. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त संघाने भाग घेण्याचे आव्हान स्पर्धेचे संपर्कप्रमुख भालचंद्र संपतराव निंबाळकर यांनी केले आहे.

