कौठळी शाळेत भरला बाल आनंदी बाजार
बाल आनंदी बाजारामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पना वाढण्यास मदत होते - संभाजी आजबे केंद्रप्रमुख.
इंदापूर प्रतिनिधी:दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जि.प प्राथमिक शाळा कौठळी शाळेत बाल आनंद मेळावा(आनंदी बाजार) भरवण्यात आला.प्रथम व्याहाळी केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजी आजबे , साहेबराव पिसाळ,ग्रामपंचायत सदस्य नामदेव मारकड,बापूसाहेब चितारे,उपस्थित ग्रामस्थ मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नंतर सर्व उपस्थित मान्यवर, पालक,ग्रामस्थांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला.
प्रास्ताविक संभाजी आजबे यांनी केले.
या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी जवळपास ३० स्टॉल लावले होते. त्यामध्ये भाजीपाला, स्टेशनरी,खाऊगल्ली,फळे असे विविध प्रकार होते.या बाजारात खरेदीसाठी गावातील महिला ग्रामस्थांनी गर्दी केली होती.बाजाराची उलाढाल जवळपास ११०००रु च्या आसपास झाली.या बाजारास सरपंच हिरामण मारकड तसेच व्याहाळी केंद्रातील शिक्षकांनी भेट देऊन खरेदी केली.या उपक्रमाचे कौतुक गावातील पालक,ग्रामस्थ तसेच शिक्षण विभागातील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात ,विस्तार अधिकारी सुनील मुगळे ,केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांनी केले.या कार्यक्रमाला गावातील पदाधिकारी,पालक,महिला,ग्रामस्थांनी उपस्थित राहून खरेदी केले.मुळे बालविक्रेते आनंदी दिसत होते.
सूत्रसंचालन भारत ननवरे यांनी केले.स्वागत शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले तर आभार शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड यांनी मानले.

