shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे नागरिक संघामध्येज्येष्ठांसाठी रोजगाराची संधी या विषयावर संवाद मेळाव्याचे आयोजन.

इंदापूर येथे नागरिक संघामध्येज्येष्ठांसाठी रोजगाराची संधी या विषयावर संवाद मेळाव्याचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी:  शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ज्येष्ठांसाठी रोजगाराची संधी या विषयावर संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  प्रमोद भंडारी सरांनी स्वागत गीत  गाऊन  कार्यक्रमाची सुरुवात केली. 
यावेळी हेंमचंद्र शिंदे  व बाबासाहेंब घाडगे  यांचा सत्कार व  देवमय हा काव्यसंग्रह तसेच ईर्ष्या  हा ग्रामीण कथासंग्रह  भेट देण्यात आला. कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी चे शब्बीर शेख , विकास देशपांडे ,हर्षदा शिंदे मॅडम, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स पॉलिसी बाबतीतही माहिती दिली.सहा दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे.त्या नंतर ऑनलाईन परिक्षा उत्तीर्ण झाले नंतरचं कामाची संधी उपलब्ध होईल.कोटक महेंद्रा इन्शुरन्स पॉलिसी बाबतीतही माहिती दिली.या वेळी  ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष  भानुदास पवार , सौ जाधव मॅडम उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, मा. नंदकुमार गुजर ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी  खबाले महाराज,  पांडुरंग जगताप , रघुनाथ खरोडे, भारत बोराटे सर, अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व ज्येष्ठ नागरिकांना स्नेह भोजन दिले. या कार्यक्रमाला एकूण 60 जेष्ठ नागरिक उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव  हनुमंतराव शिंदे  यांनी केले.
close