सामाजात असाच एकोपा पुढेही राहिल्यास सामाजोन्नती पक्की : शिवाजीराव साळवे
शौकतभाई शेख
अहमदनगर :५ फेब्रुवारी रोजी सर्व चर्मकार संघटना आणि चर्मकार बांधव सोबतच विविध जाती- धर्माच्या लोकांनी एकत्र येत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली, यापुढे देखील असाच एकोपा राहिल्यास सामाजोन्नती पक्की असल्याचे चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,महाराष्ट्रातील चर्मकार समाजातील सर्व संघटनांचे, त्यांच्या कार्यकर्त्यांचे, समाजातील बंधू- भगीनी तथा तरुण मित्रांचे यानिमित्ताने मी हार्दिक अभिनंदन करतो आहे, पाच फेब्रुवारीला संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती महाराष्ट्रात खूपच उत्साही वातावरणात साजरी झाली. त्याचे मोजमाप करणे कठीण आहे. आपण सर्वांनी संत गुरु रविदास महाराज यांच्या विचारांचा जागर केला आणि सामाजिक भान ठेवून संयम, शांतता, आणि शिस्त इतर कोणालाही त्रास न होता जयंती साजरी करून आपण एक वेगळा ठसा समाजामध्ये उमटवला. त्याबद्दल आपण सर्वजण अभिनंदनास पात्र आहात.
संत गुरु रविदास यांच्या विचारांचा जागर करत असताना आपण समाजामध्ये आपले अस्तित्व दाखवून दिले. आणि ही समाजासाठी फार मोठी गोष्ट आहे. आपण भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीने संत गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करून आपला एकोपा कायम ठेवूयात शेवटी असेही ते म्हणाले.

