शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शुक्रवार दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३
कृषी पदवीधर तरुणाने ठेवला तरुणाई पुढे आदर्श : आपल्या जन्मदिनी वसुंधरा मातेला दिली ही अनोखी भेट..!!
राहुरी : सध्याच्या कलियुगात तरुणाई आपले वाढदिवस अनावश्यक आणि वाह्यात खर्च करून साजरे करतांना दिसतात अनेक वेळा मित्र परीवार यांना मोठमोठ्या हॉटेल मद्ये जाऊन मेजवानी देतात. खूप खर्च करून साजरे करताना दिसत आहे वाढदिवस साजरा जरूर करावा पण त्यातून जनतेला संदेश घेता आला पाहिजे असा असावा. हाच विचार नांदगाव ता.नगर येथील या पदवीधर तरुणाने केला.
त्यांनी यापूर्वी देखील दरवर्षी आपल्याच गावात कृषिदिनी झाड लाऊन त्याचे संगोपन देखील केलेल आहे. याचा जर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर या तरुणाने कृषी दिनाच्या दिवशी लावलेली गावातील श्री महादेव मंदिर समोर असणारे वडाचे झाड पहा 6 वर्षा पूर्वी लावलेले रोपट्याचे रूपांतर आज एका मोठ्या वृक्षात झालेले आहे २ फेब्रुवारी रोजी सतिष या कृषि पदवीधर तरुणांचा वाढदिवस होता या वाढदिवसाला त्याने एक वेगळ्या प्रकारे साजरे करून तरुणाई पुढे आदर्श ठेवला आहे.
आपल्या वाढदिवसाला कोणताही अनावश्यक खर्च न करता ती रक्कम त्याने वृक्ष लागवड साठी वापरली एक नव्हे दोन नव्हे तर नव्हे तब्बल दहा-बारा वृक्ष जसे पिंपळ ,कदंब,वड,रेन ट्री, आदी. अनेक प्रकारचे चांगले मोठे रोप त्याने मंदिर परिसरात गावातील त्याचे मित्र परिवार हनुमान तरुण मित्र मंडळ यांच्या सोबतीने लागवड केली.
या कृषी क्षेत्राच वेड असणाऱ्या तरुणाचे नाव आहे श्री. सतीश भास्कर सोनवणे हा तरुण कृषी पदवीधर असून तो कायम शेतकरी हिताच्या विचारात असतो शेतकऱ्यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करत असतो , आपले स्वतःचे यूट्यूब चॅनल ही उपलब्ध करुन करुन दिलेलं आहे तसेच बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रातील येणाऱ्या अडचणीवर कधी कशी मात करावी याचा अंदाज तो नेहमीच आपल्या नजीकच्या शेतकऱ्यंसाठी फायदेशीर आणि किफायतशीर सल्ला प्रदान करत असतो. शेतकरयांसमोर आलेल्या अनेक समस्यांचे योग्य निवारण करत असतो म्हणूच गावातील शेतकरी मंडळींना या तरुणाचे अनेकदा कौतुकही वाटते आणि ते मनापासू त्याचे आभार देखील मानत असतात.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

