शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) :
शिवदुर्ग मित्र अँडव्हेंचर क्लब, लोणावळा यांच्या वतीने व्ही.पी.एस हायस्कूल मध्ये आयोजित दुर्ग संवर्धन, साहसी क्रीडा प्रकार ओळख व रेस्कू(संकटप्रसंगी मदतकार्य) उपक्रमात सहभाग तसेच विद्यार्थ्यांना त्यामधील संधी या विषयी चित्रफितीसह मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी आणि चित्त थरारक प्रत्यक्ष दाखवण्यासाठी महेश मसने, उपाध्यक्ष सुनिल गायकवाड, सचिवआनंद गावडे, सहसचिव सचिन गायकवाड, अनिल सुतार, समिर जोशी, ओंकार पडवळ,आयुष वर्तक, हर्ष तोंडे, अदित्य पिलाने,
सिध्देश निसाळ, दुर्वेश साठे, अजय शेलार, निकित म्हाळसकर, ओम हरसुले, तन्वी आहेर, यश सोनावणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची संकल्पना प्राचार्य अंजनी गानु यांची होती. शिक्षक प्रतिनिधी चंद्रकांत जोशी आणि गंगाधर गिरमकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. याप्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक विजय रसाळ आणि मुख्य लिपिक कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.

