महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यमहाअधिवेशन वेंगुर्ला येथे मोठ्या दिमाखात होणार!
*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.नामदार एकनाथजी शिंदे राहणार उपस्थित.*
महाअधिवेशनासाठी अडीच दिवस विशेष रजा मंजुर*
इंदापूर तालुक्यात शिक्षक समितीच्या अधिवेशनाच्या आजअखेर ५६७ शिक्षक बंधू भगिनींनी घेतल्या पावत्या...सोमवार,मंगळवार आणखी पावत्या फाटणार...उत्स्फूर्त प्रतिसाद-----ज्ञानदेव बागल(अध्यक्ष शिक्षक समिती इंदापूर)
इंदापूर प्रतिनिधी: शिक्षक समिती इंदापूर शाखेची अधिवेशन संदर्भात इंदापूर या ठिकाणी बैठक पार पडली. बैठकीमध्ये केंद्र निहाय पावती पुस्तक आढावा घेण्यात आला.आपल्या तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींनी स्व इच्छेने मोठया प्रमाणावर पावत्या फाडल्या बद्दल शिक्षक समिती इंदापूर च्या वतीने मनापासून आभार. या अधिवेशनास अडीच दिवस शासनाने विशेष रजा मंजूर केली आहे.तरी आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी आपण वेंगुर्ला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.या अधिवेशनास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री,खासदार,आमदार उपस्थित राहणार आहेत.आपण ज्या मागण्या मांडणार आहोत त्यात जुनी पेन्शन,वेतन त्रुटी,mscit, मुख्यालय अट, वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न,पदवीधर शिक्षकांचे प्रश्न यासह अनेक मागण्या आपण करणार आहोत.त्यामुळे आपल्या प्रश्नांसाठी आपल्याला वेंगुर्ला या ठिकाणी उपस्थित राहावे लागणार आहे असे या बैठकीला शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल यांनी आव्हान केले.
यावेळी माजी चेअरमन हरीश काळेल,सुनील वाघ,सुनील शिंदे,किरण म्हेत्रे,वसंत फलफले, शफीक शेख,शहाजी पोफळे,विलास पानसरे,बापू राऊत,मोहन भगत, छगन मुलानी, दिलीप पोळ,शत्रुघ्न शेळके,गणेश सोलनकर,भरत गायकवाड, दत्तात्रय लकडे, देवानंद जमदाडे,किरण लंगोटे, संतोष भोसले,संजय भोंग,रवींद्र लोखंडे,यांसह शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी,शिक्षक उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत सरचिटणीस विनय मखरे यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष भारत ननवरे यांनी मानले.*

