बोरी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आ.दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद.
इंदापूर प्रतिनिधी: दि.२६ फेब्रुवारी रोजी बोरी (ता.इंदापूर )येथे शिवार फेरी चे आयोजन बोरी पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी आयोजित केले होते.
यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. बोरी हे द्राक्षांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अत्याधुनिक उपकरणांच्या तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग करून शेती करण्यात हे गाव अग्रेसर आहे. राष्ट्रविकासाचा मार्ग हा ग्रामविकासातून जातो. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी नेहमीच आग्रही असतो.बोरी गावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा विश्वास आमदार दत्तात्रय भरणे यांनी ग्रामस्थांना दिला.
यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रताप पाटील ,भारत शिंदे, सतीश शिंदे तसेच बारामती एग्रीकल्चर संशोधक शास्त्रज्ञ तसेच द्राक्ष बागातदार संघाचे अध्यक्ष व संचालक मंडळ तसेच बोरी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.

