shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आत्मपरिक्षण कुणी करावे...एका सत्य घटनेवर आधारीत...!



     एका गावात एक तरूणांचा सामाजिक काम करणारा कंपू असतो. सगळे कार्यकर्ते सुशिक्षित व स्वयंभू.. त्यांनी एक त्यांच्यातच मनाने आणि मानाने नेता निवडला.. संघटना त्या नेतृत्वा खाली अभेद्य होती.
एक दिवस काही उत्साही कार्यकर्ते एक कार्यक्रम आयोजित करतात.. त्यांचा कार्य करण्याचा एक व्हाॅटसॅप ग्रूप असतो.. त्या ग्रूप मध्ये कार्यक्रमाच्या रोज चर्चा झडत.. कार्यक्रम पत्रिका बाजारात वाटल्या..  पोस्टर लागले.. पण ग्रूपचा नेता फक्त बघ्याचे भूमिकेत.. नेता कामात व्यस्त असेल म्हणून कुणी विचार केला नाही.

कार्यक्रमाचा दिवस उजाडला त्याठीकाणी नेता हजर नाही.. सगळे त्याला फोन करतात .. कुणाचाच फोन उचलला जात नाही.. कार्यक्रम नेत्या शिवाय यशस्वी होतो.. कार्यक्रम झाल्यावर सगळे विचारतात कार्यक्रमाला का आला नाही..

नेता बोलला कार्यक्रम ठरवताणा मला बोलावले नाही.. मी व्हाॅटसॅप पहात नाही.. मला कुणी फोन करून नेहमी प्रमाणे बोलावले नाही.. आणि नेता कार्यकर्त्यांवर नाराज राहीला.

नेत्याचे घरी कार्यक्रम निघाला नेत्याने उघडपणे सांगितले नाही.. पण मनाने एकरूप असलेल्या कार्यकर्त्यांना कळाले .. उत्साही कार्यकर्त्यांनी नेत्यासाठी संयुक्त कार्यक्रम ठेवला.. नेता कार्यक्रमाला आला .. त्याने कार्यक्रमात सगळ्यांना एकत्रीत संबोधित केले व त्याचे घरचे कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली..
व्हाटसॅप ग्रूप वर स्वत: सभासद असताना एका कार्यकर्त्याला संदेश पाठवण्यास सांगितला.. कार्यकर्त्याचा संदेश हा नेत्याचाच संदेश समजून सगळे कार्यकर्ते नेत्याचे कार्यक्रमाला हजर राहिले. कार्यक्रमाची शोभा वाढवली.. ह्या ठिकाणी नेत्याने कार्यकर्त्यांना सांगितले होते.. बोलावले नव्हते.. ह्यावरून कार्यकर्त्यांचे नेत्यांवरचे प्रेम सिध्द होते.
खरच आजच्या सगळ्याच नेत्यांची हिच प्रवृत्ती झालेली स्पष्ट दिसते आहे.. पण इमानदारीने नेत्यावर व आपल्या सामाजिक गटा वर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला असा कटू अनूभव आल्या मुळे सामाजिक कामा पासून व नेत्या पासून धडाडीचे स्वत:ला झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते दूर जाताना सातत्याने दिसतात..
नेत्यांचा कार्यकर्त्यांचे बाबत बी व सी प्लॅन तयार असतो.. त्यांना नवीन टीम पैसे, अमिषे फेकून तात्काळ मिळते .. पण सामाजिक कामात, राजकिय कामात, धार्मिक कामातला एक सैनिक वाईट अनुभवा मुळे कायमचाच शहिद होतो..
नेतृत्व करणाऱ्या सगळ्या नेत्यांना माझे आवाहन आहे .. आपल्या मागे चालणारे कार्यकर्ते आहेत म्हणून आपण आहात..
हे पाहून मला माझ्या वन मॅन आर्मीचा अभिमान वाटला किमान मला असा अनुभव येत नाही व मी कुणाला देत नाही

संजय भास्करराव काळे
close