shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ जैन गुरुकुल प्रशालेत संपन्न


प्रतिनिधी : आसावरी वायकर

सोलापूर : ११ /   स्व.आ.भा. सोनटक्के गुरुजी स्मारक निधी ट्रस्ट तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ जैन गुरुकुल प्रशालेत नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे माजी विद्यार्थी  अनिल श्रीपाल भोजे हे होते;तर सोनटक्के गुरुजी स्मारक निधी ट्रस्टचे सचिव तथा प्रशालेचे मुख्याध्यापक आशितोष शहा, विश्वस्त व प्रशालेचे माजी पर्यवेक्षक अरुणकुमार धुमाळ, माजी विद्यार्थी नागप्पा कोनापुरे व किरण शहा उपस्थित होते.

 यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक राजकुमार काळे, विभागप्रमुख राजू देशमाने उपस्थित होते.प्रारंभी स्व.आ.भा. सोनटक्के गुरुजींच्या छायाचित्रास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत अरुणकुमार धुमाळ यांनी केले तर अध्यक्ष व अतिथींचा परिचय राजू देशमाने यांनी करुन दिला.

 या स्पर्धेमध्ये नर्सरी ते महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थी विविध गटातून सहभागी झाले होते. यासाठी  सोलापूर शहर व जिल्हयातून ८५ शाळांमधून २०१३ विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यातील ७५ यशस्वी विदयार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यानंतर अध्यक्षीय मनोगतात. भोजे यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.  सर्व यशस्वी व सहभागी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले. यादीवाचन तनय गांधी, तेजस सावळे, राजेश मोहोळकर व तृप्ती दुर्गे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती दुर्गे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तेजस सावळे यांनी मानले.
close