shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोक पॉलिटेक्निकमध्ये “रगील” मराठी चित्रपटाचे प्रमोशन संपन्न...!

शौकतभाई शेख
श्रीरामपूर - मराठी चित्रपटसृष्टीत रगील या आगामी चित्रपटाचे प्रमोशन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयात सर्व टीमसमवेत संपन्न झाला.

झी मराठी म्युझिक प्रस्तुत आणि दीपक आहेर यांची निर्मिती असलेला रगील हा चित्रपट येत्या १७ फेब्रुवारीला पूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.  
एका अनोख्या प्रेमकथेवर आधारित अभिनेता प्रशांत बोदगिरे, अभिनेत्री शिवानी कथले, प्रणव रावराने, संजय मकासरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे प्रोडक्शन मॅनेजर राहुल भोसले, तेजस गोरडे, दिग्दर्शक योगेश-राकेश, संगीत वैभव लोंढे, रगील टीम सहकार्य किरण लामखडे व गायक आदर्श शिंदे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी नारायणगाव येथे चित्रीकरण झाले आहे.

दरम्यान, रगील चित्रपटातील प्रत्येक घटकामध्ये मग ते कथेपासून लोकेशन्स असो किंवा संगीतापासून सीन ट्रीटमेंटपर्यंत प्रत्येक बाबतीत वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात अभिनेत्री शिवानीने सांगितले की,  रगील म्हणजे राऊडी रगीलपणा हा प्रत्येक मुलीत असतो, प्रत्येक मुलीनी बेधडकपणे समाजामध्ये वागले पाहिजे हेच उद्दिष्टे या चित्रपटाच्या माध्यमातून पोहचवित आहोत. त्यामुळे चित्रपटाचे प्रमोशनही अशोकच्या महाविद्यालयात करीत आम्ही रसिकांसमोर चित्रपट आणत आहोत.

त्यातला रिंगटिंग गाण्याने तर चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. हे गाणेही यावेळी लावण्यात आले. विद्यार्थ्यामध्ये जात प्रशांत व शिवानीने नृत्य करीत आनंद लुटला. विद्यार्थ्यांनीही त्याला तेवढाच प्रतिसाद दिला.
या चित्रपटाचे प्रमोशन युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे सपत्नीक अशोक कारखान्याच्या संचालिका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, प्राचार्य अंजाबापू शिंदे यांनी करून रगील टीम ला शुभेच्छा देण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close