shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपा -शिवसेनेतर्फे 30 पासून जिल्हयात सावरकर गौरव यात्राभाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची माहिती


भाजपा -शिवसेनेतर्फे 30 पासून जिल्हयात सावरकर गौरव यात्राभाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची माहिती 
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 राजकीय बातमी 

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी जिल्हाभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली. ही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

    राहुल गांधी व काँग्रेस च्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही गोंदकर  यांनी  दिले.

 राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल.  ६ एप्रिल रोजी  भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. 

 उद्धव ठाकरे यांनी  काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी  उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती,असेही गोंदकर यांनी नमूद केले.
close