shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समता फाऊंडेशन आयोजित बाराही महिने रस्ता सुरक्षा अभियान..!

मा.सर्व संपादक महोदयांना नमस्कार 🙏
---------------------------------------
आपण दररोजच विविध मान्यवरांच्या विविध विषयांच्या बातम्या आपल्या लोकप्रिय प्रसार माध्यमांतून प्रकाशित करतोच, तसे बाराही महिने रस्ता सुरक्षा अभियान राबविला गेल्यास वाढत्या अपघातांवर नक्कीच आपण काही अंशी अंकुश मिळवू शकु असे मला वाटते,
कारण हल्ली वाढते अपघात ही मोठी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे, वाहतूक नियमांची माहिती (जाण) नसल्या कारणाने दिवसागणिक अनेक निर्पराधांना दुर्दैवी अपघातास सामोरे जाणे भाग पडत आहे,याकरीता वर्षाच्या बाराही महिने वाहतूक नियमांची उजाळणी होत राहिल्यास आपण काही अंशी वाढत्या अपघातांवर अंकूश मिळवू शकू असे मला वाटते, करीता मी आपल्या समता फाऊंडेशन तर्फे वर्षाच्या बाराही महिने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे, तथा जानेवारी २०२३ पासुन याची सुरुवातही केली आहे,त्यास आज जवळपास पावणे तीन महिन्यांचा कालावधी लोटला गेला आहे,बोलता बोलता वर्ष कसे संपून जाईल हे कळणार देखील नसले तरी आपण केलेले सदकार्य आपल्यासह कोणाच्यातरी कामी हे नक्की आलेले असेल वा खारीचा वाटा का असेना त्याचे पुन्य हे आपल्या नशीबी नक्कीच लाभणार आहे,करीता वाहन चालकांपासून ते पादचाऱ्यांपर्येंत सर्वांनाच वाहतुक नियम जाणून घेण्याची नितांच गरज आहे, यासाठी मी सुरुवात केली आहे, त्यावर मी माझे काम देखील करत आहे,विचारवंत तथा परोपकारी आणि वाढत्या अपघातांवर काळजी व्यक्त करणाऱ्या प्रसार माध्यम पत्रकार, संपादक बंधू भगीनींनी आपापल्या प्रसार माध्यमांतून वाहतुक नियमांची उजाळणी करणेकामी पुढाकार घ्यावा,आणि वाढत चाललेल्या अपघातांवर काही अंशी अंकुश मिळविण्यासाठी जरुर आपापल्यापरीने प्रयत्न करावा, मी असे म्हणणार नाही की, माझीच समता फाऊंडेशन ची रस्ता सुरक्षा अभियान टेम्प्लेट प्रसिद्ध करा,अथवा माझाच लेख प्रसिद्ध करा, वाहतुक नियमांपर आपणास हवे ते आपल्या स्वतः चे लेख अथवा आरटीओ अधिकारी, वाहतूक पोलिस किंवा वाहतुकीशी निगडीत अशा विविध मान्यवरांची लेख आपण प्रकाशित करु शकता,चला यानिमित्ताने आपणही काही समाजाचे देणे लागतो यासाठी सर्व समविचारी मंडळींनी एकत्र येत बाराही महिने रस्ता सुरक्षा अभियानद्वारे वाहतूक नियमांचा प्रचार,प्रसार करुयात आणि आपल्यासह आपल्याच भावंडांचे अपघातांपासून बचाव करण्यासाठी पुढाकार घेवूयात.

 शौकतभाई शेख
 समता फाऊंडेशन, श्रीरामपूर.

close