परीक्षावेळी वीजेचा लपंडाव त्वरित थांबवा,अन्यथा मानव सुरक्षा सेवा संघाच्यावतीने उग्र आंदोलन - प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे
अहमदनगर प्रतिनिधी:
सध्या राज्यभरात विद्यार्थ्यांच्या दहावी,बारावीच्या वार्षिक बोर्ड परीक्षा चालू आहे,यानिमित्ताने विद्यार्थ्यांना कटाक्षाने अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरत आहे, अशातच वीजेचा ल़पंडाव हा मोठा आडसर ठरत असून, विद्यार्थ्यांसह नागरीकांना मोठे त्रासदायी ठरत आहे,अशावेळी ऐनकेन प्रकारे कारणे देत वीज पुरवठा खंडीत करणे म्हणजे ही परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी मोठी अडवणूक ठरत असल्याने दहावी बारावीच्या परीक्षा होत नाही तोपर्यंत वीजेचा सुरळीत पुरवठा करण्यात यावा अन्यथा याविरोधात मानव सुरक्षा सेवा संघ उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.
बशीरभाई भुरे
परिक्षा निमित्त विद्यार्थ्यांना ऐन अभ्यास करण्याच्या वेळी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वीज गुल होत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरीकांनाही मोठा मनस्ताप सहन करणे भाग पडत आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून घृणास्पद देखील आहे, आजचा विद्यार्थी हा उद्या देशाचा भविष्य आहे आणि वीजेचा असाच प्रकार सुरू राहिल्यास त्यांचे भविष्य हे अंधकारमय ठरु शकतात,त्या अनुषंगाने देशाचे भविष्य देखील अंधकारमय होवू नये याकरीता विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे यांच्या आदेशान्वये मानव सुरक्षा सेवा संघाच्या माध्यमातून राज्यभरात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येतील याची (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित) महावितरण प्रशासनाने नोंद घ्यावी असेही मानव सुरक्षा सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

