shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खळी खंडोबा देवस्थान अध्यक्षपदी शांताराम उगलमुगले, उपाध्यक्षपदी अमोल उगलमुगले तर सचिवपदी सौ.सिताताई उगलमुगले बिनविरोध

अश्वि प्रतिनिधी:- संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील तसेच शिर्डी मतदार संघातील राजकिय व सामाजिक दृष्ट्या प्रबळ समजल्या जाणाऱ्या मौजे खळी येथील कुलदैवत श्री खंडोबा देवस्थान पदाधिकारी निवडी मा. धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांच्या आदेशाने पार पडल्या. मा. धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशानुसार श्री खंडोबा देवस्थान विश्वस्तांची सभा श्री खंडोबा मंदिरासमोर पार पडली.


सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ.अमोल उगलमुगले होते.यावेळी एकमताने खंडोबा देवस्थान अध्यक्षपदी श्री.शांताराम उगलमुगले, उपाध्यक्षपदी डॉ.अमोल उगलमुगले ,खजिनदारपदी तुकाराम उगलमुगले तर सचिवपदी संगमनेर तालुका महिला भाजपा अध्यक्ष सौ.सिताताई उगलमुगले यांची निवड करण्यात आली.तसेच इतर विश्वस्त सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली.स्विकृत विश्वास्त म्हणून बाळकृष्ण घुगे व सोपान वाघमारे यांच्या नावाची शिफारस मा. धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांच्याकडे करण्याचे सर्वानुमते ठरले.यावेळी माजी सरपंच सोपान वाघमारे, समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले,सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण घुगे,किसनराव घुगे,सुभाष घुगे,रवी घुगे,गंगाराम उगलमुगले, राहुल कांगणे,शांताराम सांगळे,सोमनाथ नागरे,सलीम शेख,भिमराज कातकडे, हिराबाई जाधव, दत्तू बडे,रामदास बडे, भाऊसाहेब उगलमुगले, रावसाहेब उगलमुगले, अण्णा उगलमुगले, भास्कर उगलमुगले, बाळासाहेब उगलमुगले, भानुदास उगलमुगले, राहुल उगलमुगले, संतोष नागरे, पोपट नागरे,भरत नागरे,बाळासाहेब नागरे, भानुदास कांगणे, हौशिराम आंधळे,संपत नागरे,अशोक नागरे,नारायण सानप,अंबादास सानप,राहुल कांगणे, रामचंद्र कांगणे, शिवाजी लबडे, संदीप लबडे गणेश पालवे,पोपट वाघमारे, सोमनाथ नागरे,राजेंद्र घुगे,संजय घुगे,बाळू घुगे, आदींसह दाढ बु.धारणगाव,नांदूर शिंगोटे, दोडी येथील भक्तमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्री खंडोबा महाराज यांचा अभिषेक करून नारळ वाढवून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.या वेळी नवनिर्वाचित खंडोबा देवस्थान अध्यक्ष शांताराम उगलमुगले म्हणाले की,येत्या पाच वर्षात खंडोबा देवस्थान मंदिर बांधकाम,जुन्या मंदिराचा विकास,रस्ते,लाईट,पाणी
व्यवस्था वृक्षलागवड ,भक्तनिवास,भंडारा मैदान,सभागृह,मंदिर सभामंडप,रुग्णवाहिका, या प्रकारचा विकास केला जाईल.सर्व भक्तांनी मदत व सहकार्य करण्याचे आवाहन शांताराम उगलमुगले यांनी केले.नवनिर्वाचित सचिव व संगमनेर तालुका महिला भाजपा अध्यक्षा सौ.सिताताई उगलमुगले म्हणाल्या की,देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आटोकाट प्रयत्न करू.पदाधिकारी निवडीबद्दल मा. मंत्री महोदयांनी अभिनंदन करून शुभेच्या दिल्या.


close