शिर्डी :- 4 मार्च
शिर्डी शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेश सदस्य तथा अहमदनगर जिल्हा प्रभारी श्री नानासाहेब काकासाहेब शिंदे पाटील यांचा वाढदिवस गोर गरिबांची सेवा करुन संपन्न झाला.
एक सामाजिक बांधिलकी असणारा युवा कार्यकर्ता, ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेद्वारे दिले जाणारा आदर्श समाज रत्न पुरस्कार ऑक्टोंबर 2020 चे मानकरी तसेच पोलीस बॉय असोसिएशन कडून दिला जाणारा समाजसेवक पुरस्कार 2021 चे मानकरी तसेच कोरोना काळा मध्ये केलेल्या सेवेबद्दल स्टार वेल्फेअर फाउंडेशन, ठाणे तसेच मानव सेवा प्रतिष्ठान पुरस्कृत महाराष्ट्र राज्य यांचा कोरोना योद्धा सन्मान प्राप्त,सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणारे कमी वेळेत आपल्या सामाजिक कामाच्या जोरावर जास्त प्रसिद्ध होणारे सदैव दुसऱ्यांना मदतीसाठी तत्पर असणारे सामाजिक व राजकीय कार्यात आपला ठसा उमटवणारे असे नानासाहेब शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

