अहमदनगर- नगर तालुक्यातील देहरे गावात "श्री मालोबा-श्री बालोबा" व "श्री मांगिरबाबा"चे प्रसिध्द ग्राम देवस्थान आहे.
हे देवस्थान नवसाला पावणारे असल्याने नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून गणली जाते, या यात्रेचे वैशिष्ट म्हणजे या यात्रेत गावातील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात, नगर मनमाड रस्त्यावर नगर शहरापासून २० की.मी अंतरावर देहरे हे गाव आहे.या गावातच श्री. मालोबा - बालोबा या ग्रामदैवताचे कळस नसलेले मंदिर आहे, व मांगिरबाबा हे देवस्थान गावातच देव नदी काठी वसलेले आहे, या मंदिराचे व देवस्थानचे छायाचित्र घेण्यास मज्जाव आहे.

यात्रोत्सव
श्री. मालोबा - बालोबा व मांगिर बाबा यात्रोत्सव गावचे ग्रामदैवत रंगविण्यास जाण्यापासुन महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो,
धुलीवंदनाच्या अगोदर ५ दिवस गावातील तरुण कावडीने गंगा जल आणण्यास जातात. होळीच्या एक दिवस आधी, ग्रामदैवताचे गावात सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत आगमन होते,
व होळीच्या दिवशी पहाटे ग्रामदैवतास गंगा स्नान घातले जाते. होळीच्या दिवशी गावची होळी पेटवल्या नंतर गावातील सर्व घरी होळी पेटली जाते. धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी १२ वाजल्या पासुन ३ वाजेपर्यंत पाच वर्षाच्या तरुणांपासून ते नव्वद वर्षाच्या वृद्धा पर्यंत गावातील सर्व जाती धर्माचे लोक गुलालाची उधळण करतात.यात्रोत्सव कार्यक्रम २०२३
दि. ७ मार्च रोजी दुपारी यात्रेचा उत्साहात भर येण्यासाठी ढोल ताशांच आयोजन करण्यात आले आहे,रात्री रघुवीर खेडकर यांच्या लोक नाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ८ मार्च रोजी सायंकाळी हागामा चे आयोजन करण्यात आले आहे.या कुस्ती हागाम्या साठी कै.दादा कोंडीबा काळे यांच्या स्मरणार्थ काळे कुटुबियांटडुन मानाची गदा ठेवण्यात आली आहे,या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्री. साई आमोजमेंट यांचे जॉईंट व्हील्स हे आहे.तीन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाचे यात्रा कमिटीने योग्य नियोजन केले आहे.
ग्रामस्थांनी यात्रा कमिटीस सहकार्य करुन कुठलेही गालबोट लागणार नाही याचे आव्हान यात्रा कमिटीने केले आहे.