shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी - आमदार दत्तात्रय भरणे .

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी - आमदार दत्तात्रय भरणे .

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह समेलन उत्साहात.

महाविद्यालयीन भौतिक सुविधांसाठी आमदार निधीतून २५ लक्ष भौतिक सुविधा कामासाठी जाहीर
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथील महाविद्यालयात वार्षिक स्नेह समेलन निमित्त पारंपारिक वेशभूषा दिन आणि अंताक्षरी स्पर्धा मराठी आणि हिंदी गीतमाला ,मेहंदी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा ,मिसमॅच डे आणि केशरचना स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,  बॉलीवूड डे, फॅशन शो  इ सांस्कृतिक कार्यक्रमासह वार्षिक स्नेहसंमेलन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत  उत्साहात संपन्न झाले. संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते आमदार भरणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम, विश्वस्त कुलदीप हेगडे, प्राचार्य अंकुश आहेर,उपप्राचार्य अरुण कांबळे इ मान्यवर उपस्थित होते. 
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना आमदार भरणे यांनी विद्यार्थ्यांना गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी उल्लेख करून महाविद्यालय जीवन मुक्त व सुखी असल्याने परमेश्वराने प्रसन्न होऊन इच्छा प्रकट करायला सांगितले तर मी  महाविद्यालय विद्यार्थी होण्याची मागणी करेन असे सांगितले. महाविद्यालय प्रगतीशील दिशेने वाटचाल करीत असुन महाविद्यालयीन भौतिक सुविधांसाठी आमदार निधीतून २५ लक्ष भौतिक सुविधा कामासाठी जाहीर केले.
सांस्कृतिक कार्यक्रम शेला पागोटे कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन कळंब ग्रामपंचायत सरपंच विद्या सावंत व संस्था अध्यक्षा आनंदी रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिजीत रणवरे,सचिन सपकळ,शुभम निंबाळकर,सुहास डोंबाळे, रामचंद्र कदम,संदीप डोंबाळे प्राचार्य बि के सर्वगोड ,योगेश डोंबाळे, पिंटू डोंबाळे, अतुल सावंत ,जितेंद्र रणवरे ,पोपट कारंडे,दीपक लवटे, जयंत मोरे ,विनोद रणसिंग ,विकास रणसिंग ,रामभाऊ रणसिंग, शंकर रणसिंग,स्नेहसंमेलन अध्यक्षा प्रा.ज्योत्स्ना गायकवाड,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर गुळीग ,प्रा. राजेंद्रकुमार डांगे ,प्रा. विलास बुवा,प्रा.विजय केसकर ,प्रा प्रशांत शिंदे,प्रा सुहास भैऱट,प्रा रामचंद्र पाखरे, प्रा. रविराज शिंदे,प्रा. विनायक शिंदे ,प्रा. तेजश्री हुंबे इ मान्यवर व कला वाणिज्य विज्ञान विभागातील प्राध्यापक , विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.
 भरणे यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला. सांस्कृतिक विभागामार्फत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामध्ये मराठी तसेच हिंदी चित्रपटातील गीतांचा समावेश होता. सायली सोनवणे हिने लगबग लगबग माझ्या रायाची गीत गायले.ना सांगताच आज हे कळे मला, गोंधळ मांडला, निशाना तुला दिसला ना ही गीत सादर केली.
विद्यार्थ्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटातील गीतांवर नृत्य सादर केले.चंद्रा चित्रपटातील बाई ग कस करमत नाही, भंडाऱ्यात हिरा चमकला, पावन जेवला का, आई तुझ देऊळ, अहो शेठ लय दिसाणं झालिया भेट, प्रा. विद्या गुळिग यांनी  मुंगळा मुंगळा मैं गुड की लडी हे गीत सादर केले.ओ ओ जाणे जाना धुंडे तुझे दिवणा,घर मोरे परदेशीया अशा गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये,प्रा.कपिल कांबळे यांनी मला आमदार झाल्या सारख वाटतय हे गीत सादर केले.
close