*विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून चिंचोशी गाव झाले चकाचक!
*शिबिराला लाभला गावकऱ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद!
*श्रमदान कार्यात आद्यनागरिक सरपंचासह गावकऱ्यांचा सहभाग!
*संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची अतुट गर्दी!
*गाडगे बाबांचा सहभाग असलेली स्वच्छता दिंडी ठरली कार्यक्रमाचे आकर्षक!
*"खेळ रंगला पैठणीचा "कार्यक्रम ठरला शिबिरातील सर्वोत्कृष्ट कार्यक्रम!
*शिबिराच्या समारोप कार्यक्रमा नंतर शेवटच्या दिवशी ग्रामस्थानी शिबिरार्थी स्वयंसेवकांना दिले स्वादिष्ट भोजन!
*शिबिरात समारोप कार्यक्रमांमध्ये श्रीमती सी. के. गोयल महाविद्यालयातील स्वयंसेवकांना ग्रामस्थांकडून "सन्मानचिन्ह/स्मृतिचिन्ह" देऊन केले सन्मानित!
दापोडी:-
जनता शिक्षण संस्थेच्या श्रीमती चंद्रकला किशोरलाल गोयल कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे "विशेष श्रमसंस्कार शिबिर"२६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२३कालावधी खेड तालुक्यातील चिंचोशी येथे संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन: रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी३:०० वाजता संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन मा. जि. प. अध्यक्ष सौ. निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी गावचे सरपंच सौ.उज्वलाताई गोकुळे, उप-सरपंच मायाताई निकम, ग्रामपंचायत सदस्य मंगलाताई शिंदे, गावातील सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये सात दिवसाच्या कालावधीमध्ये खालील उपक्रम राबविण्यात आले.
१) श्रमदान: विद्यार्थ्यांवर श्रमाचे संस्कार व्हावेत, ग्रामस्वच्छता या दृष्टिकोनातून शिबिर कालावधीत दररोज सकाळी ८:०० ते ११:३० या वेळेत श्रमदान उपक्रम राबविण्यात आले . त्या अंतर्गत गावातील ग्रामस्वच्छता करण्यात आली. गावातील धार्मिक श्रद्धास्थान असलेले हनुमान मंदिर, दत्त मंदिर, शंकर मंदिर, गणपती मंदिर, कानिफनाथ मंदिर, ही मंदिरे झाडलोट करून,पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आली.
गावात तील सर्व रस्त्यांच्या कडेचा परिसर, चावडी परिसर, जि. प. शाळा परिसर, हनुमान माध्यमिक विद्यालय परिसर, स्मशानभूमी परिसर, दशक्रिया घाट परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, सोसायटी कार्यालय परिसर, हनुमान मंदिरा शेजारी व ग्रामपंचायतीच्या समोरील ओट्याची दुरुस्ती, त्याचबरोबर गावातील सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करून स्वच्छ करण्यात आला.प्लास्टिक, केरकचरा, गाजर गवत काढणे अशा प्रकारची कामे करून संपूर्ण गाव चकाचक करण्यात आले.
वनराई बंधारा: पाणी आडवा पाणी जिरवाचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, पाण्याचे महत्व समजून देण्यासाठी जलसंधारण अंतर्गत शंभर सिमेंट(१००) गोणीचा वापर करून त्यामध्ये वाळू, माती भरून गावच्या ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे पाणी अडवले जाऊन आजूबाजूच्या परिसराला पाण्याची पातळी वाढण्यास व शेतीसाठी पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
शोष खड्डे: गावातील सार्वजनिक कुपनलिकांच्या उघड्यावरील पाणी जिरवण्यासाठी शोष खड्डे करण्यात आले.
वृक्षारोपण: गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
२) दुपार सत्रात प्रबोध/उद्बोधन अंतर्गत व्याख्यानमाला: शिबिर कालावधीत दररोज दुपारी ३:००ते४:३० या वेळेत संपन्न झाली त्यामध्ये श्री. संपतराव गारगोटे: "छत्रपती संभाजी महाराज"श्री. नवनाथ लोंढे:"अंधश्रद्धा निर्मूलन सहप्रयोग"श्री. सुधाकर बैसाणे:"मतदान जागृती"सुप्रसिद्ध कवयित्री सौ.अस्मिता चांदणे:"माय मातीची कविता"पत्रकार श्री. ज्ञानेश्वर मिडगुले:"संस्कारांचे त्रिकूट"अशी व्याख्याने संपन्न झाली यासाठी ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३) समाज प्रबोधन: समाजप्रबोधनांतर्गत पथनाट्य, प्रसंग नाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. त्यामध्ये अंधश्रद्धा, रक्तदान महत्व, नेत्रदानाचे महत्त्व, साक्षरता, अवयव दानाचे महत्त्व, मतदान जागृती, संविधान जागृती, आरोग्य जागृती, महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, अशा विषयांवर जनजागृती करण्यात आली.
४) सायंकाळी मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रम: शिबिर कालावधीत दररोज संध्याकाळी ८:०० ते १०:०० या वेळेत ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी व विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांच्या विकासासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये मुक अभिनय, प्रसंग नाट्य, पथनाट्य, मॉडेल्स किंवा स्टॅच्यू, गावातील शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, समूहनृत्य वैयक्तिक नृत्य, भारुड, यासारखे कार्यक्रम घेण्यात आले असून याला गावातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी कार्यक्रमांसाठी होत होती.
५) "खेळ रंगला पैठणीचा!"-संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक ३मार्च २०२३ रोजी सादर झालेला खेळ" रंगला पैठणीचा! या कार्यक्रमासाठी गावात यात्रेतील कार्यक्रमासारखी गर्दी झाली होती. हा कार्यक्रम श्री. नरेंद्र गायकवाड व सहकारी यांनी सादर केला. मानाच्या पैठणीची मानकरी ठरल्या सौभाग्यवती सुनंदाताई दौंडकरताई आणि उप-विजेत्या ठरल्या सौभाग्यवती प्रतिभा कानडे, आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कुमारी भाग्यश्री चांदणे.
६) ग्रामस्वच्छता जागृती प्रभातफेरी: शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या आधी गावातून शनिवार दिनांक ४ मार्च२०२३रोजी सकाळी ८:०० ते ९:३० या वेळेत संपूर्ण गावातप्रभात फेरीचे आयोजन करून करून जनजागृती करण्यात आली. यामध्ये गावकरी व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रभात फेरीमध्ये संत गाडगेबाबा स्वयंसेवकांमधून बनविण्यात आले होते. ते फेरीच्या पुढे स्वच्छतेचा संदेश देत साफसफाई करत होते. ग्रामस्थांनी गाडगेबाबांचे ठिकठिकाणी पूजन करून स्वागत केले. फेरीमध्ये स्वच्छ करा स्वच्छ करा परिसर आपला स्वच्छ करा!, मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान!, झाडे लावा झाडे जगवा! ,रक्षण करा रक्षण करा पर्यावरणाचे रक्षण करा!, पाणी आडवा पाणी जिरवा!, यासारखा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता.
७) शिबिराचा समारंभ कार्यक्रम: शनिवार ४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते ११:३० या वेळेत शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. सुरेशराव निकम (अध्यक्ष हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ, चिंचोशी), व प्रमुख पाहुणे म्हणून चाकण पोलीस स्टेशनचे पी. आय. श्री. शेंडकर साहेब तसेच गावचे सरपंच सौ.उज्वलाताई गोकुळे, ग्रामपंचायत सदस्य मंगलाताई शिंदे, श्री. सयाजीराव मोहिते(मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड) सौ. विद्याताई मोहिते(सरपंच, शेल पिंपळगाव), श्री. सुरेशराव गोकुळे, श्री.मधुकर दरगुडे(मुख्याध्यापक हनुमान विद्यालय, चिंचोशी)ग्रामपंचायत सदस्य श्री.अमोल कानडे, श्री. बाळासाहेब दौंडकर (मा.पोलीस अधिकारी), श्री. मंगेशअप्पा निकम (मा. चेअरमन,चिंचोशी), श्री. अभिषेक कानडे (सुप्रसिद्ध शिवव्याख्याते), श्री. संभाजी निकम (प्रसिद्ध गाडामालक) श्री.शांताराम दौंडकर (सामाजिक कार्यकर्ते)गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या समारोप कार्यक्रमात श्रीमती.सी.के.गोयल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने" स्मृतिचिन्ह/सन्मान चिन्ह" देऊन मोठ्या सन्मानाने गौरव करण्यात आला.
शिबिरात एकूण७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
शिबिराचे संयोजन: महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमातील प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा. दिपाली खर्डे, प्रा. परबराव बैसाणे, प्रा. प्रितेश पठारे, प्रा. वैभव डावखर, महेंद्र शिंदे यांनी केले.
संयोजनासाठी राष्ट्रीय सेवा विभागातील गटप्रमुख शितल गायकवाड, निकिता पानसरे, सायली शेळके, शिवानी पवार, मानसी बोरकर, रोहित गोडबोले, मंदार गावडे, प्रीती बिराजदार, काजल काटे, कपिल कांबळे, रत्नप्रभा मोरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

