भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ३० / अहमदनगर शहर येथे क्रां . चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठाण मार्फत आज दि . ३० मार्च रोजी चौपाटी कारंजा येथे श्री राम नवमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.
यावेळी भाविक भक्तांसाठी लाप्शी व सार भात या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नागरिकांचा व युवकांचा उत्साह ओसंडुन वाहत होता .अनेक राजकीय सामाजिक मान्यवरांची उपस्थिती दिसुन आली .
सामाजिक व धडाडीचे कार्यकर्ते पै .मयुर बोचुघुळ यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला .
यावेळी सामाजिक कार्यकर्ते निकेश बाविसकर , अमित पाखले , अविनाश परळकर, मुकेश दिवाणे, सागर लोळगे , सचिन गांधी, उमेश कारंजकर , विनायक गुरसाळी , पप्पू ताकपिरे, भावे , प्रणिल बोगावत , गणेश मारवाडे , बबन , आशिष ताकपिरे , विजय मडके, विशाल बोचुघुळ , सुनिल ससाने , सुजित राऊत , सचिन सप्रे, नाना भंडारी , बबलु खराडे , गणेश अष्टेकर , पप्पू देवतरसे, भागानगरे , आदिनाथ येंडे , विलास भोपळे, मरकड , कपिल सुडके, अजय मडके, प्रसन्न बिडकर , अर्णव दिवाने आदि युवक उपस्थित होते .

