shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गंगेच पाणी,पालखी पदयाञेकरुंना जनेश्वर प्रतिष्ठाण, साईआश्रम रिक्षा संघटनेच्या वतीने खिचडी महाप्रसाद वाटपाचा सेवाभावी उपक्रम

साईभक्तांची सेवा करण्याची संधी मिळते हे आमचे भाग्य - प्रशांत कोते

राजेंद्र बनकर - शिर्डी 
श्री रामनवमी उत्सवानिमित्त  शिर्डीत येणाऱ्या भाविकांची सेवा घडावी या उदात्त हेतूने  शिर्डीतील विविध सामाजिक संघटना येणाऱ्या भाविकांसाठी आपल्या परिने सेवा देऊन साईभक्तांची सेवा करत आहे.
दरवर्षी प्रमाणे शिर्डीतील जनेश्वर प्रतिष्ठाण शिर्डी शहर , ना. राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना साई आश्रम , तसेच साई आश्रम मिञ मंडळ व जीप चालक मालक संघटनेच्या वतीने शिर्डीत येणाऱ्या पदयाञेकरुंना आणि श्री रामनवमी निमित्तानं श्री साईबाबांना कावडीने गंगाजल  घेऊन येणाऱ्या भाविकांना पाचशे किलो भाबुदाणा खिचडी व थंड पाण्याची व्यवस्था करुन भाविकांच्या सेवेत हा महाप्रसादाचा सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला आहे. 

आपल्याला शिर्डीत येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याचे भाग्य लाभत असुन दरवर्षी प्रमाणे आपण श्री.रामनवमी निमित्तानं कोपरगाव वरुन गंगेच पाणी घेऊन येणारे भाविक तसेच पालखी पदयाञेकरुसाठी सावळीविहीर ते निमगाव या मध्यवर्ती ठिकाणी भाविकांसाठी हा सेवाभावी उपक्रम राबवत असल्याचे संस्थापक प्रशांत कोते अध्यक्ष रविंद्र शेळके यांनी सांगितले.
हा सेवाभावी सामाजिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी जनेश्वर प्रतिष्ठाण शिर्डी शहर चे संस्थापक प्रशांत कोते ,  अध्यक्ष रविंद्र शेळके , शंकर आवारे , विशाल दहिवाळ ,  संतोष जेजुरकर , बाळासाहेब गायकवाड , रमेश शेळके, सागर शिंदे , सुनील जेजुरकर, आकाश नवसारे , विकी जाधव, संदीप शेजुळ ,विजय जेजुरकर ,गणेश शिंदे ,संतोष धुळे ,अमोल वाडगे ,संदीप मगर ,दीपक आवारे, गणेश कुटे ,निलेश शेळके ,विजय गुडगे ,रवींद्र भागवत, संदीप मगर, सागर गायकवाड ,राजेंद्र निकम , बाळासाहेब शिंदे, मोबीन शेख , गोकुळ बारगळ,जाकीर पठाण , मन्सूर शेख ,रहमान पठाण , प्रवीण देशमुख , जयंत शेलार , सचिन निकम , साईराम सोहसे , रवींद्र जगताप , नितिन नागरे , रवी खरात , प्रवीण माळी , संतोष खैरनार आदीसह सदस्यांनी परिश्रम घेतले आहे.
close