श्रीरामपूर प्रतिनिधी :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातर्फे डॉ. सौ. शीतल सुसरे /गागरे यांनी मिळविलेली मराठी विषयातील उच्च अशी डॉक्टरेट पदवी आजच्या ग्रामीण गृहिणी, स्त्रीपुढे आदर्श असल्याचे मत नेकनूर येथील संत सद्गुरू बंकटस्वामी संस्थानचे ह. भ. प. रामायणाचार्य नाना महाराज कदम यांनी व्यक्त केले.
श्रीरामनवमी निमित्त तांभेरे येथे कीर्तनसेवा कार्यक्रमात ग्रामस्थांनी डॉ. शीतल सुसरे /गागरे व श्री राजेंद्र पंढरीनाथ गागरे यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते केला, त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. शीतल सुसरे, गागरे यांनी संशोधन व पदवी माहिती दिली, आपला सत्कार महाराज व ग्रामस्थांनी केला, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. बेलापूर कॉलेजमधील प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. शिवाजी काळे, प्रा. तुकाराम पाटील यांचे विशेष मार्गदर्शन, सहकार्य मिळाले, माहेरचे सुसरे व सासरचे गागरे परिवार यांचे मनापासून सहकार्य झाल्यामुळेच मी एवढी मोठी पदवी मिळवू शकले असे डॉ. शीतल सुसरे, गागरे यांनी सांगून तांभेरे ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी तांभेरे रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पा. मुसमाडे, सचिव चंद्रकांत पा. पवार, गोकुळदास पा. मुसमाडे, विलासराव पा. मुसमाडे, सुनील पा. गागरे आणि भक्तगणांसह ग्रामस्थ उपस्थित होते. राजेंद्र गागरे यांनी आभार मानले.
*वृतसंकलन: स्वाभिमानी न्यूज नेटवर्क*

