shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहरातील नागरिकांसाठी भाजपाच्या वतीने मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड कॅम्पचे आयोजन*

*इंदापूर शहरातील नागरिकांसाठी भाजपाच्या वतीने मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड कॅम्पचे आयोजन*
  इंदापूर:भारतीय जनता पक्ष इंदापूरच्या वतीने राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहरातील नागरिकांसाठी मोफत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना- आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड कॅम्पचे दिनांक  5 व 6 मार्च 2023 रोजी आयोजन केले असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष शरद जामदार आणि शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी दिली.
   घरातील प्रत्येक व्यक्तीला 5 लाखापर्यंत निशुल्क उपचार असलेली आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आरोग्यदायी योजनेचा कार्ड कॅम्पचे आयोजन इंदापूर शहरातील नागरिकांसाठी शहरातील तुळजाभवानी मंदिर अंबिकानगर , सावतामाळी मंगल कार्यालय सावतामाळीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिकभवन आंबेडकरनगर, शिवसेना भवन श्रीराम सोसायटी , दत्त मंदिर समोर अष्टेकर ज्वेलर्स शेजारी खडकपुरा , श्रीराम मंदिर रामवेसनाका , गणपती मंदिर सरस्वतीनगर , व्यंकटेश मंदिर व्यंकटेशनगर ,नामदेव मंदिर कासारपट्टा येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
close