shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या माध्यमातून इंदापूर कदम विद्यालयातील साडेपाचशेहून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.

रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या माध्यमातून इंदापूर कदम विद्यालयातील साडेपाचशेहून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.
इंदापूर: रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या माध्यमातून इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले .यामध्ये तब्बल ५५० हून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. इंदापूर रोटरी चे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुधीर तांबिले आणि डॉ. यतीन शिंदे यांच्या सहकार्यातूनही तपासणी करण्यात आल्याचं रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी यांनी सांगितले.
 यावेळी इंदापूर रोटरी चे अध्यक्ष नरेंद्र गांधी, मेडिकल डायरेक्टर डॉ. सुधीर तांबिले, मेडिकल को डायरेक्टर डॉ. यतीन शिंदे, रोटरीचे सचिव सुनील मोहिते, खजिनदार नितीन शहा, धरमचंद लोढा, नंदकुमार गुजर, भीमाशंकर जाधव, मनोहर बेंद्रे, प्रमोद भंडारी ,प्राचार्य भास्कर वाबळे, पर्यवेकषिका पुष्पा काळे
इत्यादी उपस्थित होते.
close