shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त होतोः सौ.मंजुश्रीताई मुरकुटे...!

श्रीरामपूर प्रतिनिधी:
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत होते. अनेक वैज्ञानिक बाबींची उकल होते. यातूनच विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त होवून त्यांच्या वैज्ञानिक क्षमतेला चालना मिळते असे मत अशोक ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील अशोकनगर येथील अशोक कारखाना संलग्न अशोक आयडीयल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन तसेच प्रश्नमंजुषा कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. अशोक आयडियल स्कूलमध्ये आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा  कार्यक्रमामध्ये श्रीरामपूर शहरातील विविध शाळांनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा साठी विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यातून विद्यार्थ्यांची गुणानुसार निवड करण्यात आली. प्रश्नमंजुषा मध्ये विज्ञान विषयाशी संबंधित विविध प्रश्न विचारुन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये विविध प्रकारचे राऊंड घेण्यात आले. त्यामध्ये ऑडिओ-व्हिज्युअल, पासिंग व क्वश्चन रॅपिड फायर राऊंड असे वेगवेगळे राऊंड घेण्यात आले. त्यानुसार वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी क‘मांक पटकाविले.

दोन गटामध्ये या प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते नववी या दोन्ही गटामध्ये प्रथम क‘मांक श्रीराम अ‍ॅकॅडमी या शाळेने, द्वितीय क‘मांक समता इंटरनॅशनल स्कूलने पटकाविला. पहिल्या गटामध्ये द्वितीय श्रीराम अ‍ॅकॅडमी आणि तृतीय अशोक आयडियल स्कूलने पटकाविला. उत्तेजनार्थ सेंट झेवियर स्कूलने पटकाविला. दुसर्‍या गटामध्ये द्वितीय क‘मांक सेंट झेविअर व तृतीय क्रमांक अशोक आयडियल स्कूलने पटकाविला.

स्पर्धेत विजेते झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण समारंभ अशोक ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांचे हस्ते पार पडला.यावेळी प्राचार्य रईस शेख, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रतिमा लोहाटे, डॉ.रोहिणी खपके, डॉ.तुपे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कूलच्या विज्ञान शिक्षिका चित्रा मुठे, रेश्मा जंगले, दरंदले, दुधाळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

close