केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी : आसावरी वायकर
जायकवाडी : १२ / सैतवाल जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले आचार्य श्री १०८ आर्यनंदी महाराजांचा ११६ वा जयंती सोहळा ६ मार्च रोजी ढोरकीन येथे मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला.
या सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री संदीपान भुमरे, सैतवाल जैन
संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपराव घेवारे, महामंत्री मुकुंद वालचाळे, कोषाध्यक्ष विजयकुमार लुंगाडे, राष्ट्रीय मंजूर केला. सचिव महावीर घोडके, पवन अंबुरे, शालिनी पळसापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात सकाळी दहा वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर गावातून शोभायात्रा काढून शांतीनाथ भगवंताचा अभिषेक करण्यात आला.
यावेळी पैठण भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, नंदलाल काळे, प्रमोद डेरे, संजय महाजन, शांतीलाल बोराळकर, राजेंद्र अवतारे, नीलेश सावळकर, डी. डी. वायकोस, विजय मेहेत्रे, महावीर गोसावी, नंदकुमार कंगळे आदी उपस्थित होते .

