shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिठेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ .

पिठेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ .
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील पिठेवाडी येथे श्री संत सद्गुरु बाळूमामा भंडारा यात्रा उत्सवानिमित्त १२ मार्च ते १९ मार्च या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होणार असून आज दिनांक १२ मार्च रोजी सकाळी ग्रामदैवत यांची वाद्याच्या गजरामध्ये पूजा करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास कलश, विना, टाळ, मृदुंग इत्यादी विविध पूजा विविध मान्यवर यांच्या हस्ते संपन्न करण्यात आल्या. या सोहळ्यास अतिशय श्रद्धेने श्री संत बाळूमामा भक्त मंडळ व ग्रामस्थ पिठेवाडी  यांनी उपस्थिती दर्शवली होती. 
या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सकाळी महापूजा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, संगीत रामायण, हरिपाठ, कीर्तन व आरती आणि महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठ  चालक म्हणून हरिभक्त परायण दामोदर महाराज सावंत हे सेवा करणारा असून यामध्ये प्रवचन सेवा ह.भ. प. काकासो महाराज हुबाले  पिठेवाडी, दत्तात्रय महाराज वाघमोडे पिठेवाडी, राजेंद्र महाराज सावंत यांचे पाच दिवस संगीत राम कथा होणार आहे. तसेच कीर्तन सेवा विठ्ठल महाराज पाटील रेडणी, लालचंद महाराज चोपडे इंदापूर, राजेंद्र महाराज सावंत बीड, गोपीनाथ महाराज बानगुडे परांडा, दत्ता महाराज नंदुरगे पोथरकर, नंदूकाका महाराज आरगडे लाखेवाडी, दामोदर महाराज सावंत आळंदी तर काल्याचे किर्तन लक्ष्मण महाराज कोकाटे श्री क्षेत्र कन्हेरी यांचे होणार आहे.
या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये श्री.संत बाळूमामा भक्तांच्या वतीने नाष्टा व महाप्रसादाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
close