इंदापूर रासप युवक आघाडीच्या वतीने कळस - वालचंदनगर गटातील कामांना निधी मंजूर करावा म्हणून दिले मुख्यमंत्री सचिवाकडे मंत्रालयात पत्र.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडीच्या अध्यक्षाच्या वतीने कळस वालचंदनगर जिल्हा परिषद गटातील विकास कामांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या सचिवा कडे दिनांक २० मार्च रोजी२०२३ रोजी सुपर्त करण्यात आले.
या निवेदन पत्राद्वारे कळंब ग्रामपंचायत येथे सार्वजनिक शौचालयासाठी, कळंब, वालचंदनगर येथे सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यासाठी दलितवस्ती सुधार योजनेमधून मल्हारनगर इंदिरानगर कळंब ग्रामपंचायत येथे सार्वजनिक विनोदालय व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यासाठी, तसेच कळस, वालचंदनगर, जंक्शन ,आनंदघन, अंथूर्णे येथे सार्वजनिक शौचालयासाठी दलित वस्ती सुधार योजनेमधून महेश जगताप ते पांडुरंग दनाने घर सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर भोरकरवाडी कळंब येथील शोभीकरण व पेवर ब्लॉक या कामासाठी. श्री क्षेत्र पाचलिंग मंदिर कळंब येथे पेवर ब्लॉक वॉल कंपाऊंड या कामासाठी. श्रीराम मंदिर ते अभिजीत खंडागळे घर येथे दलित वस्ती सुधार योजनेमधून सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता करण्यासाठी . लासूर्णे ग्रामपंचायत येथील राजीव गांधीनगर येथे ओपन जिम साठी इत्यादी कामासाठी आपल्या स्तरावरून कारवाई करून सदर पत्रामध्ये देण्यात आलेल्या विकास कामासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशा विनंती चे पत्र देण्यात आले.

