shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिराजीमामा मंजूळे व रवि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार अभिमन्युजी पवार यांचा लवकरच करण्यात येणार भव्य सत्कार....!

नाशिक:-  अखिल महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे कार्याध्यक्ष  पिराजी मामा मंजूळे व शिवक्रांती वडार फाऊंडेशनचे प्रदेशाध्यंक्ष श्री.रवि शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने वडार समाजाचे कैवारी आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

3 जून २०१८ रोजी लातूर येथे वडार समाजाचा माननिय आमदार श्री.अभिमन्यु पवार साहेब यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वडार समाजाचा महामेळावा घेण्यात आला होता. तेव्हापासून आमदार श्री.अभिमन्यु पवार साहेब यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा चालू ठेवला होता.याचबरोबरोबर वडार समाजाचे नेते पिराजी मामा मंजूळे, लातूरचे कार्यकर्ते व रवि शिंदे,अहमदनरचे रमेश जेठे(सर),नाशिकचे कार्यकर्ते, यांनीही शासननिर्णय व्हावेत यासाठी वेळोवेळी पाठपुरावा चालू ठेवला होता.

आमदार श्री अभिमन्युजी पवार (औसा)

यानंतर नुकतेच चालू अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने वडार समाजासाठी पैलवान कै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात येऊन ५० कोटीची बजेटमध्ये आर्थिक तरतूद करण्यात आली. यासाठी वडार समाजाचे कैवारी माननिय आमदार श्री.अभिमंन्यु पवार साहेब व माजी स्थायी समिती सभापती लातुर श्री. नितीनजी वाघमारे यांनी या महामंडळासाठी विशेष व महत्त्वपुर्ण प्रयत्न केले.
त्यामुळे माननिय आमदार श्री.अभिमंन्यु पवार साहेब यांचे मोठे योगदान आहे. यानिमित्ताने पिराजीमामा व रवि शिंदे व टिमच्या वतीने लवकरच आमदार पवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी राजू जाधव,बलराज वारकर, अनिल शेलार,वसंतराव गुंजाळ,रमेश जेठे, सदाशिव जाधव, शंकर माने व कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत.
close