शौकतभाई शेख
श्रीरामपूर - स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी छञपती शिवरायानंतर समर्थपणे स्वराज्याचे रक्षण केले. स्वराज्य व धर्मरक्षणासाठी त्यांनी बलिदान दिले. मृत्युलाही न डगमगता त्यांनी धर्मरक्षक म्हणून केलेले कार्य कधीच विसरता येणार नाही. छत्रपती संभाजीराजेंनी आपल्या शौर्य व पराक्रमाने इतिहासात आपला ठसा उमटविला,असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
श्रीरामपूर येथे लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी छ.संभाजी महाराज यांचे प्रतिमेस श्री.मुरकुटे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, अशोक बँकेचे व्हा. चेअरमन अॅड.सुभाष चौधरी, मार्केट कमिटीचे माजी संचालक रमेश सोनवणे, कारेगाव भाग कंपनीचे संचालक भगवान सोनवणे, खादी ग्रामोद्योग संघाचे व्हा.चेअरमन प्रविण फरगडे, नानासाहेब मांढरे, राजेंद्र कंत्रोड महाराज, संदीप डावखर, विशाल धनवटे, नवाब सय्यद, प्रदीप जाधव, बाळासाहेब शिंदे, गणेश लोळगे, रोहित मालकर, जयेश परमार, ज्ञानदेव वर्पे, कैलास भागवत, लालाशेठ देवी, प्रमोद करंडे, संजय मोरगे, सोहम मुळे, पंकज देवकर आदी उपस्थित होते.

